Womens Safety : रेल्वे प्रवास करणाऱ्या स्त्रिया आणि मुलींच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथकाचा पुढाकार, जनजागृती मोहिमेचे आयोजन

दैनंदिन लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांशी संवाद

120
Womens Safety : रेल्वे प्रवास करणाऱ्या स्त्रिया आणि मुलींच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथकाचा पुढाकार, जनजागृती मोहिमेचे आयोजन
Womens Safety : रेल्वे प्रवास करणाऱ्या स्त्रिया आणि मुलींच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथकाचा पुढाकार, जनजागृती मोहिमेचे आयोजन

रेल्वेमधील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुण्यातील रेल्वे सुरक्षा बलातील तेजस्विनी पथकाने पुढाकार घेतला आहे. याकरिता जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रेल्वे हेल्पलाईनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मोहिमेबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सुरक्षा बल उदयसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तेजस्विनी पथकामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक पूनम शर्मा आणि 2 महिला आरपीएफ कर्मचारी असून हडपसर येथील निरीक्षख प्रिती कुलकर्णी या पथकाचे पर्यवेक्षण करत आहे. हे पथक पुणे ते लोणावळापर्यंत रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलींच्या संरक्षणाबाबत काम करत आहे.

(हेही वाचा – Chandrayaan – 3 : अंतराळात जाणारे सर्वच यान सफेद रंगाचेच का असतात? जाणून घ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे)

डेक्कन, इंटरसिटी, सिंहगड एक्स्प्रेस आणि दैनंदिन लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांशी संवाद साधला जातो. याकरिता सोशल मिडियावरही ग्रुप तयार करण्यात आला आहे. यामध्ये दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांना जोडण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये पुणे, शिवाजीनगर, हडपसर येथील आरपीएफ पथकाचे कर्मचारी, अधिकारी, यात्री सुरक्षा निरीक्षक यांचाही या ग्रुपमध्ये समावेश आहे.

महिला प्रवाशांशी संपर्कात राहण्याची सुविधा
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने महिला प्रवाशांच्या संपर्कात राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाटी आणि रेल्वेतील सुरक्षेबाबत सूचना देणे, जागरुकता निर्माण करणे, घटनांचे अहवाल देण्यास फायदेशीर ठरणार आहे. प्रवासात समस्या उद्भवल्यास रेल्वे हेल्पलाईन 139 आणि 7219613777 यावर संपर्क साधून महिला किंवा मुली मदत मागू शकतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.