Purchase of waste bins : नगरसेवकांच्या नावाखाली १ लाख २० हजार कचरा डब्यांची खरेदी; दोन वर्षांत ४६९ रुपये जास्त दराने खरेदी

नगरसेवक हे कचरा साठविण्यासाठी १२० लिटर क्षमतेच्या एच.डी.पी.ई. कचरापेटया त्यांच्या नगरसेवक निधीतून खरेदी करुन विविध नागरी वसाहतींना कचरा या बंदिस्त कचरा डब्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात साठविण्यास प्रेरीत करण्यासाठी आग्रही असतात.

277
Purchase of waste bins
Purchase of waste bins : नगरसेवकांच्या नावाखाली १ लाख २० हजार कचरा डब्यांची खरेदी; दोन वर्षांत ४६९ रुपये जास्त दराने खरेदी
सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिका ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांची मदतही संपली. परंतु महापालिका अस्तित्वात नसल्याने नगरसेवक नाही. तरीही नगरसेवक हे कचरा (Purchase of waste bins) साठविण्यासाठी १२० लिटर क्षमतेच्या एच.डी.पी.ई. कचरापेटया (Purchase of waste bins) त्यांच्या नगरसेवक निधीतून खरेदी करुन विविध नागरी वसाहतींना कचरा या बंदिस्त कचरा डब्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात साठविण्यास प्रेरीत करण्यासाठी आग्रही असतात. त्यांच्याकडून या कचरा डब्यांची मागणी होत असल्याची कारणे देत मुंबईत तब्बल १ लाख २० हजार कचरा पेट्यांची खरेदी केली जात आहे.

(हेही वाचा – बढतीपूर्वीच अनेक पोलीस अधिकारी निवृत्तीच्या वाटेवर)

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या कचरा पेट्या (Purchase of waste bins) अवघ्या १११५ रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते. या कचरा पेट्या वितरकांकडून खरेदी करताना एवढी रक्कम होती.परंतु आता उत्पादक कंपन्यांकडून या पेट्यांची खरेदी केली जात असून त्यासाठी १५८४ रुपये म्हणजे ४६९ रुपये अधिक मोजून या पेट्यांची खरेदी केली जात आहे. नगरसेवक नसताना नगरसेवकांच्या नावाखाली ही खरेदी होत असून प्रशासकाच्या कालावधीत अधिक दराने ही खरेदी केली जात असल्याने एक प्रकारे संशयाला जागा निर्माण झाली आहे.

मुंबई घन कचरा गोळा करून वाहून नेण्यासाठी संयुक्तिक अशा कॉम्पॅक्टर गाडया व बंदिस्त कंटेनर्स तथा कचरापेटया (Purchase of waste bins) महानगरपालिकेने वापरात आणले आहेत. महानगरपालिकेने खरेदी केलेल्या कॉम्पॅक्टर्समध्ये तसेच सर्व विभागात भाडेतत्वावर वापरण्यात येणा-या कॉम्पॅक्टर्समध्ये १२० लिटर क्षमतेच्या बंदिस्त कचरापेट्या उचलण्याची व्यवस्था आहे. या कचरा पेटया या कॉम्पॅक्टर्सद्वारे सहजपणे उचलता येतात व रिकाम्याही करता येतात. त्यामुळे महापालिका शाळा, रुग्णालये, विभाग इत्यादी खात्यांमध्येही या कचरा पेट्यांची मागणी असते.

हेही पहा – 

घनकचरा (Purchase of waste bins) व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्या निविदा मागवताना,नगरसेवक या प्रकारच्या कचरापेटया त्यांच्या नगरसेवक निधीतून खरेदी करुन विविध नागरी वसाहतींना कचरा, बंदिस्त कचरापेट्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात साठविण्यास प्रेरीत करण्यासाठी आग्रही असतात, असा युक्तिवाद केला होता. सद्यस्थितीत विविध विभागातील नागरी वसाहतींकडून तात्पुरत्या स्वरुपात कचरा साठविण्यासाठी १२० लिटर क्षमतेच्या एच.डी.पी.ई. कचरा पेट्यांचा (Purchase of waste bins) वापर केला जात आहे. परिणामी वापरास सोईस्कर असलेल्या १२० लि. क्षमतेच्या एच.डी.पी.ई. कचरा डब्यांची मागणी नगरसेवक यांच्याकडून विभागस्तरावर प्राप्त होत असल्याने व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांकरीता १२० लि. क्षमतेच्या एच. डी. पी. ई. च्या बंदिस्त कचरापेट्या, दोन वर्षाच्या कालावधीकरीता गरजेनुसार प्राथमिक कचरा संकलनाकरिता एकूण१,२०,००० नग खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी तीन गट बनवण्यात आले आणि त्यानुसार प्रत्येकी ४० हजारच्या गटासाठी निविदा मागवण्यात आले. यामध्ये विमप्लास्ट या कंपनीने १५८४.७१ रुपये एवढा दर आकारला होता,तर दुसऱ्या दोन गटांमध्ये निलकमल ने १५९३ रुपये आणि एरीस्ट्रॉप्लास्ट प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने १५९८ एवढ्या दराची बोली लावली होती. त्यामुळे अखेर १५८४ या कमी दरात सर्व उत्पादक कंपन्यांनी या डब्यांचा (Purchase of waste bins) पुरवठा करण्याचा तयारी दर्शवली. या निविदेत या तीनच कंपन्यांनी भाग घेतला होता आणि तिन्ही कंपन्या तीन गटांमध्ये पात्र ठरल्या. त्यामुळे या कंपन्यांनी संगनमत करून ही कामे मिळवली असल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी पर्जन्य जल वाहिनी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या निविदेत कंत्रादारांनी संगनमत करून काम मिळवल्याच्या ठपका ठेवत ११ कंपन्यांना या विभागाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच या प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने लक्ष घालत पर्जन्य जल विभागाकडून याची माहिती मागवली आहे. त्यामुळे याठिकाणी उत्पादक कंपन्यांवर संगनमत केल्याचा ठपका ठेवला जाणार का असा सवाल केला जात आहे.

अशाप्रकारे आहेत विभाग आणि त्यासाठी नेमलेले कंत्राटदार

गट- १

वॉर्ड :ए. बी. सी. डी. ई. एफ/द, एफ/ उ, जी/द, जी /उ.

नग : ४०,०००

नियुक्त कंत्राटदार: विमप्लास्ट लिमिटेड

एका पेटीचा दर :१५८४.७१ रुपये

एकूण खर्च : ६.३३ कोटी रुपये

गट -०२

वॉर्ड :एच / प,पी/द, पी/उ, एल, एम / प , एम / पू, एन, एस, टी,आर/द, आर / मध्य, आर / उ

नग:४०,०००
नियुक्त कंत्राटदार: निलकमल लिमिटेड

एका पेटीचा दर :१५८४.७१ रुपये

एकूण खर्च : ६.३३ कोटी रुपये

गट -०३

वॉर्ड : एच/पू, के/पू, के/प

नग : ४०, ०००

नियुक्त कंत्राटदार: एरीस्ट्रॉप्लास्ट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड

एका पेटीचा दर :१५८४.७१ रुपये

एकूण खर्च : ६.३३ कोटी रुपये

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.