Barsu Refinery :  महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आज बारसू रत्नागिरीमध्ये आला आहे, अशी टीका नितेश राणे यांनाी केली.

160
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला 
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसू Barsu Refinery येथे जाऊन प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला तेव्हा प्रकल्प हुकूमशाही पद्धतीने थोपवला तर महाराष्ट्र पेटवून देऊ अशी धमकीच दिली, त्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही त्यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली, महाराष्ट्र नाही तर लोकांच्या चुली पेटवा, असे आवाहन राणे यांनी केले.

काय म्हणाले नितेश राणे? 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आज बारसू Barsu Refinery, रत्नागिरीमध्ये आला आहे. उद्धव ठाकरे हे पेटवा पेटवीची भाषा करत आहेत. पेटवा पेटवी करण्यासाठी ते बारसूत आले आहेत. महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र  महाराष्ट्र नाही तर लोकांच्या चुली पेटवा. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे म्हणून पत्र दिले होते. मात्र आता ते विरोध करत आहेत. हा विचार नेमका कसा बदलला? हा विचार कोकणच्या जनतेसाठी नाही, तर खिशात पैसे आले पाहिजे. मातोश्रीवर खोके आले पाहिजे म्हणून बदलला, असा आरोप नितेश राणे यांनी केला. उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आज बारसू रत्नागिरीत आला आहे. यांना मुंबई मनपाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी, परदेशात जाण्यासाठी आणि कपड्यांची खरेदी करण्यासाठी गुजराती चालतात. आणि कोकणच्या विकासावरून विनोद करतात, याचा विचार जनतेने केला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत हे कोकणच्या विकासाला लागलेला शाप आहे. ही चपट्या पायांची माणसे कोकणात येतात आणि प्रकल्पांना विरोध करतात, असा आरोपही नितेश राणे यांनी केला.

(हेही वाचा Barsu Refinery: आता शरद पवारांना का भेटता? उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.