Manipur Riot : मणिपूर पेटले; ५४ जणांचा मृत्यू; १० हजार जवान तैनात

५४ मृतांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर १५ मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इम्फाळ पूर्व येथे आहेत.

208
मणिपूर पेटले
संग्रहित छायाचित्र

न्यायालयाच्या निर्णयाचे मणिपूरमध्ये तीव्र पडसाद उमटले असून या ठिकाणी जाती समुदायात दंगल Manipur Riot उसळली आहे. तिसऱ्या दिवशीही या ठिकाणची परिस्थिती संवेदनशील आहे. या ठिकाणी उसळलेल्या दंगलीत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती आहे. दरम्यान या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे.

दंगलीतील Manipur Riot ५४ मृतांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर १५ मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इम्फाळ पूर्व येथे आहेत. याशिवाय सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे १०,००० जवान राज्यात तैनात करण्यात आले आहेत. पोलीस मात्र याची पुष्टी करण्यास तयार नव्हते. हे मृतदेह इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, चुराचंदपूर आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या अनेकांवर RIMS आणि जवाहरलाल नेहरू मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत. १३,००० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यांना लष्कराच्या छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

(हेही वाचा Manipur Violence: मणिपूरमध्ये सरकारचा दंगलखोर दिसताच क्षणी गोळ्या मारण्याचे आदेश; काय आहे हा नेमका वाद?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.