भारतातील दहशतवादी कारवायांसाठी दाऊदने पुरवले पैसे; NIA च्या आरोपपत्रात दावा

117

केंद्रीय तपास संस्था राष्ट्रीय तपास संस्थेने टेरर फंडिंग प्रकरणात मोठा दावा केला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमकडून पैसे पाठवण्यात येत होते. त्यासाठी हवाला मार्गाचा वापर दाऊदकडून करण्यात येत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. मागील 4 वर्षांत हवालाद्वारे दहशतवादी कारवायांसाठी सुमारे 12 ते 13 कोटी रुपयांची रसद दाऊदने भारतात पाठवली असल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.

( हेही वाचा: ठाण्यातील विवियाना माॅल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल )

दहशतवाद्यांना होणा-या आर्थिक मदतीबाबत केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. या तपासादरम्यान काहींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांच्या चौकशीदरम्यान काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. फरार अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याने हवाला रॅकेटचा वापर करुन दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवला असल्याचे समोर आले आहे. दाऊद इब्राहिमने दहशतवादी कारवायांसाठी मुंबईत 25 लाख रुपये पाठवले होते, असेही एनआयएने म्हटले आहे.

दुबईमार्गे पाठवले पैसे 

मुंबईत दहशतवादी कारवाया आणि मोठे हल्ले घडवण्यासाठी दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा शकलीने दुबईमार्गे पाकिस्तानातून 25 लाख रुपये पाठवले असल्याचे एनआयएने म्हटले. हा पैसा सुरतमधून भारतात आला होता. त्यानंतर तिथून मुंबईला पोहोचला होता. हे पैसे हवालाद्वारे आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांच्यापर्यंत पोहोचवले गेले. मारच्या चार वर्षांत हवालाद्वारे दहशतवादी निधीसाठी जवळपास 12 ते 13 कोटी रुपये भारतात पाठवण्यात आले असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.