कोविड टेंडर घोटाळा- पुढच्या आठवड्यात होणार ‘यांची’ चौकशी

कोविडच्या काळात झालेल्या टेंडर घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे.

124
कोविड टेंडर घोटाळा- पुढच्या आठवड्यात होणार 'यांची' चौकशी

ईडीकडून सुरू असलेल्या कोविड टेंडर घोटाळा प्रकरणात अधिकारी,कंत्राटदार, पुरवठादार आणि राजकीय सबंध असणाऱ्या व्यक्ती ईडीच्या रडारवर आले आहेत. या व्यक्तींना पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलविण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

कोविडच्या काळात झालेल्या टेंडर घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. मागील काही दिवसांपासून ईडीकडून अनेक संशयितांच्या घरी, कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या. या धाडसत्रात ईडीच्या हाती अनेक महत्वाची कागदपत्र आणि पुरावे लागले. या पुराव्यानुसार कोविड टेंडर घोटाळ्यात मनपाचे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार, पुरवठाधार आणि मध्यस्थी करणारे राजकीय संबंध यांची नावे समोर आली आहेत. या लोकांनी कोविड काळात केलेले व्यवहार, खरेदीची कागदपत्रे तसेच त्यातून झालेल्या गैरव्यवहाराचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत.

(हेही वाचा – कोविड टेंडर घोटाळा; जाणून घ्या नक्की कोण आहे यासीर फर्निचरवाला)

दरम्यान या सर्व व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या ४ ते ५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. ओळख पटविण्यात आलेले संशयित हे महानगर पालिकेतील गैरप्रकरावर राजकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवत होते, तसेच या गैरप्रकरात त्याचा देखील तेवढाच हातभार होता असे देखील तपासात समोर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, “कोणत्या पुरवठादारांना कंत्राट मिळावे हे मध्यस्थ ठरवत होते आणि अप्रत्यक्षपणे कंत्राटे देत होते. सूत्रांनी सांगितले की, ईडीने व्हॉट्सअॅप चॅट्स, डायरी आणि या मध्यस्थांनी पुरवठादार, राजकारणी आणि बीएमसी अधिकार्‍यांसह कथितपणे केलेल्या रोख व्यवहारांच्या तपशील ईडीच्या हाती लागला आहे.

या ४ ते ५ मध्यस्थी पैकी एक म्हणजे युवासेना सचिव सूरज चव्हाण, हा आदित्य ठाकरेंच्या जवळचा आहे. मध्यस्थ म्हणून चव्हाण यांचे नाव थेट चार ते पाच कंत्राटांमध्ये आलेले आहे. चव्हाण यांच्याशी संबंधित रोखीच्या व्यवहारांची तपासणी सुरू आहे. चव्हाण यांच्या १० कोटी रुपयांच्या चार फ्लॅटची माहिती ईडीच्या हाती लागली आहे, हे फ्लॅट कोरोना महामारीच्या काळात खरेदी करण्यात आल्याचे समजते. या संशयिताकडे चौकशी करण्यासाठी पुढील आठवड्यात त्यांना ईडी कार्यालयात बोलविण्यात येणार असून त्यांना बोलविण्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.