Devendra Fadnavis : शवासन कुणाला करावे लागते ते बघू! देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

219
Devendra Fadnavis : शवासन कुणाला करावे लागते ते बघू! देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis : शवासन कुणाला करावे लागते ते बघू! देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ (नड्डे म्हणजे घसा) केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते… असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.

उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला फडणवीस यांनी लगेच ट्विट करून उत्तर दिले. मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

(हेही वाचा – Govandi : गोवंडी शिवाजीनगर येथे भूमिगत नाल्याची सफाई करताना दोन कामगारांचा मृत्यू)

चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रिपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर… मुंबईला कुणी लुटले यावर… मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर… मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर… १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर काढा. तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.