कोल्हापूरातल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस सतर्क; सोशल मीडियावर अधिक लक्ष

219
कोल्हापूरातल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस सतर्क; सोशल मीडियावर अधिक लक्ष
कोल्हापूरातल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस सतर्क; सोशल मीडियावर अधिक लक्ष

व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्याच्या निषेधार्थ बुधवारी ७ जून रोजी कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या हिंदुत्ववादी संघटनाच्या मोर्चाला हिंसक वळण आले. काही काळ कोल्हापुरातील शहराचे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण पोलिसांना हा जमाव पांगवण्यात यश आले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. याच पार्श्वभूमीवरून संभाजीनगरमधील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाण्यातील प्रमुखांना ग्रुप कॉलिंगद्वारे पेट्रोलींग वाढवण्याचे आदेश दिले आले आहेत. शिवाय सोशल मीडियावरही काही चुकीच्या अफवा पसरू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – कोल्हापूर कनेक्शन ते उद्धव ठाकरे; काय म्हणाले नितेश राणे?)

कोल्हापुरात नेमके काय घडले?

कोल्हापूर जिल्ह्यातील काही विशिष्ट समाजकंटक तरुणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानाचा फोटो स्टेट्सवर ठेवला होता. या प्रकरणामुळे हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमा होऊन तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी करू लागले. दरम्यान त्याचवेळी एका गटाने एका विशिष्ट समाजाच्या वस्तीवर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळले. याच पार्श्वभूमीवर बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली त्याच दरम्यान मोठा जमाव जमा झाला. या प्रकरणामुळे काही वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेकीचे प्रयत्न करण्यात आले. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज तर अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या.

इंटरनेट बंद करण्याच्या हालचालींना वेग….

कोल्हापुरातील हिंसाचाराच्या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलिसांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत शहरात चुकीची अफवा किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होऊ नये या उद्देशाने इंटरनेट सेवा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.