Chandigarh University Incident: मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

111

पंजाबमधील मोहालीमध्ये एक लाजिरवाणा प्रकार घडला आहे. चंदीगड विद्यापिठातील मुलींच्या वसतिगृहातील एका तरुणीने आपल्या 60 मैत्रिणींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो इंटरनेटवर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे लक्षात आल्यानंतर मुलींकडून जोरदार निदर्शने करण्यात आली असून 8 विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

चौकशीचे आदेश

विद्यापिठातील विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनी आक्रमक झाल्या व त्यांनी निदर्शने करायला सुरुवात केली. पण हा धक्का पचवू न शकल्याने 8 तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्वीट केले आहे. चंदीगड विद्यापिठातील घटनेबाबत ऐकून मला दुःख झाले. आपल्या मुली आपल्या अभिमान आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कोणी या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

शनिवारी रात्री उशिरा विद्यापिठाच्या गेट क्रमांक २ वर विद्यार्थिनींनी निदर्शने करून गोंधळ घातला. यावेळी शेकडो विद्यार्थिनी इथे जमल्या आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. असे एमएमएस बनवणाऱ्या तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटली असून वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनाने इतर विद्यार्थिनींसमोर तिची चौकशी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत विद्यार्थिनीने सांगितलं की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती.

(हेही वाचाः Chandigarh University: अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने 8 जणींनी उचलले टोकाचं पाऊल)

ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या तरूणीविरूद्ध एफआयआर नोंदवला आहे. या घटनेचा सोशल मीडियावर जोरदार निषेध करण्यात येत असून, ट्विटरवर #justiceforCUgirls असा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.