2050 मध्ये महिला-पुरुष होणार 50-50

127

आज जगात कुठल्याही क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा अजिबात मागे नाहीत. त्यामुळे महिला या केवळ यशस्वी पुरुषाच्या मागेच नाही, तर पुरुषांच्या पुढे जाऊन यशस्वी होताना पहायला मिळत आहेत. असे असले तरी जगभरात महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा कमी आहे. पण 2050 पर्यंत महिलांची संख्या देखील पुरुषांइतकीच होईल, असे UN च्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 2050 पर्यंत महिला संख्येच्या बाबतीतही पुरुषांशी बरोबरी करणार असल्याचे म्हटले जात आहे.

महिलांची संख्या होणार पुरुषांबरोबर

World Population Prospects 2022 या UN द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 11 जुलै रोजी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये लोकसंख्येबाबतची संभाव्य आकडेवारी देण्यात आली आहे. 2022 मध्ये जगात पुरुषांची संख्या 50.3 टक्के असून महिलांची संख्या ही 49.7 टक्के इतकी आहे. ही संख्या समाधानकारक असून आगामी काळात यात नक्कीच वाढ होईल असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 2050 पर्यंत जगात महिलांची संख्या ही पुरुषांच्या बरोबरीनेच होईल, अशी शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे.

(हेही वाचाः स्वतःचं इंटरनेट देणारं ‘हे’ आहे देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य!)

भारत लोकसंख्येत होणार नंबर 1?

जगात सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीन असून चीनची लोकसंख्या 142 कोटी 60 लाख इतकी आहे. तर लोकसंख्येत दुस-या स्थानावर असलेल्या भारताची लोकसंख्या 141 कोटी 20 लाख इतकी आहे. मात्र 2023 मध्ये भारत लोकसंख्येबाबत चीनलाही मागे टाकू शकतो, असा अंदाज या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे. इतकंच नाही तर 2050 मध्ये भारताची लोकसंख्या 166 कोटी 80 लाख होऊन चीनच्या लोकसंख्येत मात्र कमालीची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2050 मध्ये चीनची लोकसंख्या 131 कोटी 70 लाख होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना 5 हजार रुपये मिळणार? काय आहे सरकारचे आवाहन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.