Brandon Bruce Lee : ब्रूस लीचा ‘हा’ मुलगासुद्धा होता अभिनेता

269
Brandon Bruce Lee : ब्रूस लीचा 'हा' मुलगासुद्धा होता अभिनेता
Brandon Bruce Lee : ब्रूस लीचा 'हा' मुलगासुद्धा होता अभिनेता
ब्रूस ली हा खूप मोठा अभिनेता आणि मार्शल आर्ट्स चॅम्पियन होता. त्याच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकललेले नाही. मात्र त्याचा मुलगा देखील अगदी तरुण वयात वारला. मुलाचा मृत्यू अजाणतेपणाने झाला. ब्रूस लीच्या मुलाचे नाव होते ब्रँडन ब्रूस ली. (Brandon Bruce Lee) त्याचा जन्म १ फेब्रुवारी १९६५ रोजी कॅलिफोर्निया येथे झाला. त्याचे वडील म्हणजे प्रख्यात मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता ब्रूस ली (Bruce Lee) आणि आईचे नाव लिंडा ली कॅडवेल असे होते.
शो डाऊन इन लिटल टोकियो चित्रपटातून पदार्पण
अर्थात लहानपणापासूनच त्याने वडिलांकडून मार्शल आर्ट्सचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्याचबरोबर लहानपणी आपल्या वडिलांच्या चित्रपटांची शूटिंग बघायला जातांनाच त्याच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली. नियमित सरावामुळे तो वयाच्या पाचव्या वर्षी चांगला मार्शल आर्ट्स करू लागला होता. १९९१ मध्ये आलेल्या शो डाऊन इन लिटल टोकियो (Show down in Little Tokyo) या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट वॉर्नर ब्रोस (Warner Bros) निर्मित होता.
प्रॉप गनने जखमी होऊन मृत्यू
मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही आणि समीक्षकांनीही टीका केली. पुढे त्याने 20th Century Fox ने तयार केलेल्या रॅपिड फायर या चित्रपटात काम केले. हा चित्रपट फारसा चालला नाही. पण समीक्षकांनी लीच्या अभिनयाची पहिल्यांदा स्तुती केली. पुढे त्याने ’द क्रो’ (The Crow) या चित्रपटात काम केले. मात्र हा चित्रपट त्याच्यासाठी सुदैवी ठरला व दुर्दैवी देखील ठरला. कारण लोकांना हा चित्रपट आवडला आणि त्याच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. पण शूटिंग दरम्यान प्रॉप गनने जखमी झाला आणि पुढे त्याचा मृत्यू झाला. ब्रूस लीच्या मुलाचाही शेवट दुर्दैवी असाच झाला. (Brandon Bruce Lee)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.