Unseasonal Rains : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २,१०९ कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

228
Unseasonal Rains : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २,१०९ कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

(हेही वाचा – Corruption In India : भारतात भ्रष्टाचारात वाढ; डेन्मार्कमध्ये शून्य भ्रष्टाचार)

२ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत –

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे (Unseasonal Rains) नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. मात्र नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली होती.

(हेही वाचा – Indian Coast Guard Day 2024 : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेले भारतीय तटरक्षक दल)

नाशिक विभागाकरिता १४४ कोटी निधी वितरणास मान्यता –

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या महिन्यात अवेळी पाऊसामुळे (Unseasonal Rains) झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त, नागपूर, कोकण, अमरावती, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. तसेच यापूर्वी १० जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता १४४ कोटी निधी वितरणास मान्यता दिली असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. (Unseasonal Rains)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.