Corruption In India : भारतात भ्रष्टाचारात वाढ; डेन्मार्कमध्ये शून्य भ्रष्टाचार

Corruption In India : सन २०२२ मध्ये भारत ८५व्या स्थानी होता. आशियात सिंगापूरने (Singapore) भारताला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

266
Corruption In India : भारतात भ्रष्टाचारात वाढ; डेन्मार्कमध्ये शून्य भ्रष्टाचार
Corruption In India : भारतात भ्रष्टाचारात वाढ; डेन्मार्कमध्ये शून्य भ्रष्टाचार

सन २०२३ मध्ये भ्रष्टाचार निर्देशांकात १८० देशांमध्ये भारत ९३व्या क्रमांकावर होता. भारताची गुणसंख्या सन २०२२मध्ये ४० होती, ती घसरून ३९ झाल्याचे ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. (Corruption In India)

(हेही वाचा – Maharashtra Karnataka Boundary Dispute : म्हणून केंद्राने कर्नाटकसह महाराष्ट्रालाही बजावली नोटीस)

सिंगापूरने पटकावले आशियात पहिले स्थान

भ्रष्टाचार निर्देशांक ० ते १०० या पातळीदरम्यान मोजला जातो. शून्य म्हणजे अत्यंत भ्रष्ट आणि १०० म्हणजे भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ. सन २०२३ मध्ये भारताची गुणसंख्या ३९ होती, तर २०२२ मध्ये ती ४० होती. सन २०२२ मध्ये भारत ८५व्या स्थानी होता. आशियात सिंगापूरने (Singapore) भारताला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ने केला अहवाल

‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ (Transparency International) ही संस्था सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार देशांची भ्रष्टाचारानुसार क्रमवारी ठरवते. संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांकात डेन्मार्क (Denmark) पहिल्या स्थानी (सर्वांत कमी भ्रष्टाचार) असून त्या पाठोपाठ फिनलंड (Finland), न्यूझीलंड (New Zealand) आणि नॉर्वे (Norway) यांचा क्रमांक लागतो.

(हेही वाचा – स्वातंत्र्य चळवळीत १० महिने तुरुंगवास भोगलेले गुजराती साहित्यिक आणि पत्रकार Venibhai Purohit)

भारताच्या भ्रष्टाचार निर्देशांकातील चढउतार इतके कमी आहेत की, कोणतेही ठोस निष्कर्ष काढता येत नाहीत. पण निवडणुकांआधी दूरसंचार विधेयक मंजूर झाल्यास भारतात नागरी स्वातंत्र्याचा आणखी संकोच होताना आढळेल, असे या अहवालात वर्तवण्यात आले आहे. (Corruption In India)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.