Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील

अंतरिम अर्थसंकल्पात सीतारामन कोणकोणत्या तरतुदी आणि घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्र्यांना निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करावी लागणार आहे. त्यामुळे मोठ्या अथवा लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

195
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील

संसदेच्या अर्थसंकल्पीय (Budget 2024) अधिवेशनास बुधवार, ३१ जानेवारी पासून सुरुवात झाली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच गुरुवार १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी सादर होत असल्याने सरकारला तो पूर्ण स्वरूपात मांडता येणार नाही.

(हेही वाचा – Budget Session 2024 : भारत टॉप 5 अर्थव्यवस्थांत पोहोचला; राष्ट्रपतींनी केले सरकारचे कौतुक)

अंतरिम अर्थसंकल्पात सीतारामन कोणकोणत्या तरतुदी आणि घोषणा (Budget 2024) करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्र्यांना निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करावी लागणार आहे. त्यामुळे मोठ्या अथवा लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प –

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहेत. जेव्हा अर्थमंत्री नव्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील, तेव्हा संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्यावर खिळतील. कारण हा अर्थसंकल्प अनेक बाबतींत खास आहे. सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकांच्या वर्षात हा अर्थसंकल्प कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचा – Maharashtra Karnataka Boundary Dispute : म्हणून केंद्राने कर्नाटकसह महाराष्ट्रालाही बजावली नोटीस)

शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा ?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पात (Budget 2024) शेतकऱ्यांसाठी नवीन कर प्रणाली प्रस्तावित केली आहे. असे मानले जाते की पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दिली जाणारी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली जाऊ शकते. एका वर्षात ती ६ हजार रुपयांवरून ९ किंवा ९ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. अर्थमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत महिलांसाठी वेगळी रक्कम जाहीर करण्याचीही अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – Corruption In India : भारतात भ्रष्टाचारात वाढ; डेन्मार्कमध्ये शून्य भ्रष्टाचार)

जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार –

अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा १२ वा अर्थसंकल्प सादर करतील. या अंतरिम अर्थसंकल्पात ४ महिन्यांच्या खर्चाची घोषणा केली जाईल आणि निवडणुकीनंतर जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प गरीब, युवक, अन्नदाता, महिला कल्याण या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल. (Budget 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.