Budget 2024 : निर्मला सीतारामन कधी, किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प? जाणून घ्या वेळापत्रक

पायाभूत सुविधा क्षेत्र, ‘मनरेगा’, ग्रामीण भागातील रस्ते, पीएम किसान सन्मान निधी आणि पीएम विश्वकर्मा यासारख्या योजनांसाठीच्या तरतुदीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

219
Budget 2024 : निर्मला सीतारामन कधी, किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प? जाणून घ्या वेळापत्रक
Budget 2024 : निर्मला सीतारामन कधी, किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प? जाणून घ्या वेळापत्रक

संसदेच्या अर्थसंकल्पीय (Budget 2024) अधिवेशनास बुधवार (३१ जानेवारी) सुरुवात होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी सादर होत असल्याने सरकारला तो पूर्ण स्वरूपात मांडता येणार नाही.

अंतरिम अर्थसंकल्पात सीतारामन कोणकोणत्या तरतुदी आणि घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्र्यांना निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागणार आहे. त्यामुळे मोठ्या अथवा लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे हे अखेरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. आगामी अर्थसंकल्पाची (Budget 2024) सर्व तयारी देखील पूर्ण झाली आहे. हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणूकीपूर्वी सादर होत आहे. त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

अर्थसंकल्पात ‘या’ तरतुदी सादर होण्याची शक्यता…

पायाभूत सुविधा क्षेत्र, ‘मनरेगा’, ग्रामीण भागातील रस्ते, पीएम किसान सन्मान निधी आणि पीएम विश्वकर्मा यासारख्या योजनांसाठीच्या तरतुदीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उत्पादन आधारित सवलत योजनेचा (पीएलआय) सरकारकडून विस्तार केला जाऊ शकतो.

तर सामाजिक सुरक्षेच्या योजनांसाठी भरीव तरतूद केली जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर आणि कंपनी कराच्या वसुलीत समाधानकारक वाढ होण्याची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष करवसुलीचे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत १ लाख कोटी रुपयांनी जास्त राहू शकते.

अर्थसंकल्प कधी सादर होणार…
दरवर्षी एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. नेहमीप्रमाणे यंदाही अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार (Budget 2024 Date And Time) आहेत. या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे हा पूर्ण अर्थसंकल्प नाही. ही तात्पुरती आर्थिक योजना किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ आहे, अशी कल्पना अर्थमंत्र्यांनी दिलीय.
अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ ही साधारणत: सकाळी ११ वाजता असते. यंदाही त्याचवेळेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प (Interiam Budget) १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता लोकसभेत मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच यावर्षी अर्थसंकल्प सादर केला जातोय, त्यामुळे तो विशेष आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.