Bishan Singh Bedi Funeral : सेहवाग आणि कपिलसह अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या साक्षीने बिशनसिंग बेदी यांना अखेरचा निरोप 

बिशनसिंग बेदी यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी क्रिकेटपटू तसंच चाहते यावेळी उपस्थित होते 

61
Bishan Singh Bedi Funeral : सेहवाग आणि कपिलसह अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या साक्षीने बिशनसिंग बेदी यांना अखेरचा निरोप 
Bishan Singh Bedi Funeral : सेहवाग आणि कपिलसह अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या साक्षीने बिशनसिंग बेदी यांना अखेरचा निरोप 

ऋजुता लुकतुके

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि कपिल देवसह (Bishan Singh Bedi Funeral) अनेक क्रिकेटपटू आज बिशन सिंग बेदी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. याशिवाय असंख्य चाहतेही जमले होते. माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झालं. त्यानंतर मंगळवारी नवी दिल्लीत लोढी गार्डन इथं त्यांच्यासाठी एक प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी कपिल देव, विरेंद्र सेहवाग, मदनलाल आणि कीर्ती आझाद यांनीही अंत्यदर्शन घेतलं. याशिवाय आशिष नेहरा, अजय जाडेजा आणि मुरली कार्तिकही बेदी कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले होते. मुरली कार्तिक बिशनसिंग बेदींना आपला गुरू मानायचा. आणि फिरकीचे धडेही त्याने बेदी यांच्याकडेच गिरवले होते. त्यामुळे बिशन सिंग यांची आठवण काढताना कार्तिक भावूक झाला होता.

‘बेदींना फिरकीचे सरदार म्हणायचे ते काही उगाच नाही. म्हणूनच दिल्लीचे आजपर्यंतचे प्रथमश्रेणी क्रिकेटपटू त्यांच्या अंत्यदर्शनासाठी इथं आले आहेत. बेदी चाणाक्ष क्रिकेटपटू होते. आणि त्या आधी एक चांगले व्यक्ती होते,’ असं मुरली कार्तिक यावेळी बोलताना म्हणाला.

(हेही वाचा-Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात )

१९४६ मध्ये अमृतसर इथं बिशन सिंग बेदींचा जन्म झाला होता. आणि भारताकडून ते ६७ कसोटी सामने खेळले. आणि यात त्यांनी २६६ बळी मिळवले. एकूण १४ वेळा त्यांनी पाच पेक्षा जास्त बळी घेतले. तर सामन्यात १० बळी घेण्याची कामगिरी त्यांनी चारदा केली.

बेदींच्या काळात भारतात फिरकी बहाद्दर चार खेळाडू संघात होते. बेदींच्या बरोबरच इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि वेंकटराघवन असे हे चार फिरकूपटू होते. आणि १९६६ ते १९७८ च्या दशकात या चौघांचं भारतीय संघातील महत्त्व मोठं होतं. या चौघांपैकी बिशन सिंग बेदी यांनी १९६६ ते १९६९ या काळात भारतीय संघाचं नेतृत्वही केलं.

तर निवृत्तीनंतर १९९० च्या दशकांत काही काळ ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. आणि नंतर काही काळ त्यांनी निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. याशिवाय सुनील जोशी, मनिंदर सिंग आणि मुरली कार्तिक यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.