Manoj Jarange On Maratha Reservation : आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपली; काय आहे पुढची दिशा

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही. त्यांनी चाळीस दिवसाचा वेळ घेतलेला आहे. समाजाने मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवला आहे, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

57
Manoj Jarange On Maratha Reservation : आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपली; काय आहे पुढची दिशा
Manoj Jarange On Maratha Reservation : आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपली; काय आहे पुढची दिशा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी संपली. (Manoj Jarange On Maratha Reservation) त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात विविध गावांमध्येही सर्कलनिहाय साखळी उपोषण सुरू होणार आहेत. सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर २८ ऑक्टोबरपासून हे साखळी उपोषण आमरण उपोषणात रूपांतरित होईल, असा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. तसेच, आंदोलनादरम्यान नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णयही आंतरवाली सराटीसह अनेक गावांत घेण्यात आला आहे. तसेच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange On Maratha Reservation)

(हेही वाचा – Bishan Singh Bedi Funeral : सेहवाग आणि कपिलसह अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या साक्षीने बिशनसिंग बेदी यांना अखेरचा निरोप )

सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही. त्यांनी चाळीस दिवसाचा वेळ घेतलेला आहे. समाजाने मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवला आहे, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. (Manoj Jarange On Maratha Reservation)

जरांगे यांनी पुढे म्हटले आहे, ‘गिरीश महाजन साहेबांनी सांगितले की, उपोषणाला बसू नका शरीराला ताण होईल. मग आरक्षण द्या, मी उपोषणाला बसत नाही. चार दिवसात कायदा पारित होत नाही, म्हणून वेळ द्या, असे गिरीश महाजन यांनी सांगितले होते.  कायद्याचा आधार घेऊन कायदा पारित करावा लागेल, त्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. आम्ही चाळीस दिवस दिले. मग आता वेळ कशासाठी पाहिजे ? समाज म्हणून आम्ही त्यांना एक घंटाही वेळ देऊ शकत नाही. तुम्ही आज रात्रीच आरक्षण जाहीर करा, असेही त्यांनी सुनावले आहे. (Manoj Jarange On Maratha Reservation)

जरांगे यांची मराठा समाजाला विनंती

मराठा समाजातील काही युवक आत्महत्या करत आहेत. जरांगे यांनी मराठा समाजाला आत्महत्या न करण्याची विनंती करत सोबत लढण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे. आत्महत्या करू नका. आरक्षण कसे देत नाही, ते आम्ही पाहू माझ्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तुम्ही उभे रहा माणसे कमी होता कामा नये. आता आमरण उपोषण सुरू केले जाणार असून त्यामध्ये उपचारही घेतले जाणार नाही. पाणी घेतले जाणार नाही, टोकाचे उपोषण केले जाणार, असेही मनोज जारांगे पाटील यांनी सांगितले आहे. (Manoj Jarange On Maratha Reservation)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.