Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात 

एका बसला ट्रकने मागून धडक दिली, त्याच वेळी धडक देणाऱ्या ट्रकला पाठी मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने मागून धडक दिल्याने बस पलटी झाली. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या.

39
Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात 
Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात 

दसरा मेळावा (Shahapur Bus Accident) आटोपून गावी परतणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ विचित्र असा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना असून यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. या भीषण अपघातात 25 जण जखमी झाले आहेत.  (Shahapur Bus Accident)

(हेही वाचा – Police Recruitment : पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत आहात; ‘ही’ चूक करू नका)

दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या तीन बसचा शहापूरजवळ कळंभे गावाजवळ अपघात झाला. शिवसैनिक मुंबईहून सिल्लोडला जात असताना हा भीषण अपघात घडला. एका बसला ट्रकने मागून धडक दिली, त्याच वेळी धडक देणाऱ्या ट्रकला पाठी मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने मागून धडक दिल्याने बस पलटी झाली. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर, इतर दोन बसचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्त्यावर काचांचा खच पडला आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शहापूर केंद्राचे कर्मचारी, शहापूर पोलीस मदतीला घटनास्थळी दाखल झाले. सध्या जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदतकार्य आणि वाहने हटवण्याचे काम केले जात आहे. (Shahapur Bus Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.