APAAR ID : आधारप्रमाणे विद्यार्थ्यांची ओळखही होणार निश्चित

23
APAAR ID : आधारप्रमाणे विद्यार्थ्यांची ओळखही होणार निश्चित
APAAR ID : आधारप्रमाणे विद्यार्थ्यांची ओळखही होणार निश्चित

देशभरात जवळपास ३० कोटी विद्यार्थी आहेत. (APAAR ID) त्यात ४.१ कोटी उच्च शिक्षण आणि जवळपास ४ कोटी कौशल्यविकास कोर्सशी निगडित आहेत. इतर शाळेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आयडी देण्यात येणार आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सिस्टिम लागू झाल्यानंतर या सत्रात एक हजाराहून अधिक उच्च शिक्षण संस्थांतील एक कोटींहून जास्त विद्यार्थ्यांनी अपारसाठी नोंदणी केली आहे. सर्व ३० कोटी विद्यार्थ्यांना अपार क्रमांक देऊन या परिघात आणण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.  नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळा, उच्च शिक्षण व स्किलिंग या तीनही कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची माहिती एकाच छताखाली असावी, अशी सरकारची भूमिका आहे. (APAAR ID)

(हेही वाचा – Police Recruitment : पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत आहात; ‘ही’ चूक करू नका)

ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आयडी (APAAR ID) देशभरातील विद्यार्थ्यांची युनिक ओळख होणार आहे. तो आधारप्रमाणे १२ अंकी युनिक क्रमांक असेल. हा आयडी कोणत्याही विद्यार्थ्याला नर्सरी, शाळा वा महाविद्यालयात प्रवेश घेताच मिळेल. त्यात शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी ट्रान्सफर, प्रमाणपत्र पडताळणी, स्किल ट्रेनिंग, इंटर्नशिप, स्कॉलरशिप, अवॉर्ड, कोर्स क्रेडिट ट्रान्सफर आणि इतर माहिती डिजिटल रूपात एकत्र केली जाईल.

अपार आयडी आधार क्रमांकाच्या माध्यमातून प्रसिद्ध होईल. तो केवळ शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातूनच बनेल. त्यासाठी  पालकांची संमतीही घेतली जाईल. कारण ही माहिती शैक्षणिक विभाग आणि संस्थांकडून दिली जाईल. त्यानुसार मुलांच्या आधार कार्डची पडताळणी केली जाईल. अपारशी निगडित रेकॉर्ड डिजिलॉकरमध्ये उपलब्ध असेल. सर्वांची पडताळणी करण्याचे तंत्रज्ञान आवश्यक होते.  (APAAR ID)

देशातील सर्व संस्थांकडे आपले विद्यार्थी, शिक्षकांची माहिती असते. मात्र ती एकाच फॉर्मेटमध्ये नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. एकाच सिस्टिमध्ये सर्वांची पडताळणी होऊ शकेल, असे तंत्रज्ञान हवे होते. अनेकदा वेगवेगळ्या संस्थांकडे एकाच संस्थेबाबत उपलब्ध माहिती वेगवेगळी असू शकते. आता एकाच प्लॅटफॉर्मद्वारे माहिती साठवली जाणार असल्याने या समस्या संपुष्टात येतील. (APAAR ID)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.