सीबीआयने मृत घोषित केलेला साक्षीदार थेट न्यायालयात झाला हजर

106

देशातील नावाजलेली केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयवर नामुष्की ओढवल्याची घटना घडली आहे. बिहारमधील एका पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाच्या खटल्यात एक अजब प्रकार पहायला मिळाल्याने सीबीआयवर ही वेळ आली आहे. या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या सीबीआयने या प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू झाल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, तो साक्षीदार स्वतः न्यायालयात हजर झाल्याने सगळेच चक्रावून गेले आणि सीबीआयवर नामुष्की ओढवली.

महिला थेट न्यायालयात हजर

बिहारचे पत्रकार राजदेव रंजन यांच्या मृत्यू प्रकरणात साक्षीदार असलेल्या बदामी देवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती सीबीआयकडून जिल्हा दिवाणी न्यायाधीशांना देण्यात आली. पण याच बदामी देवी थेट न्यायालयात हजर झाल्याने सीबीआयला तोंडघशी पडावे लागले. संबंधित साक्षीदार महिलेने तिचे ओळखपत्र, मतदान आणि पॅन कार्ड दाखवून आपली ओळख न्यायालयाला पटवून दिली आहे. तसेच हे सर्व नियोजनबद्धपणे करण्यात आल्याचेही या महिलेने न्यायाधीशांना सांगितले आहे.

(हेही वाचाः प्रेषित पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपकडून प्रवक्त्याचं निलंबन)

सीबीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात याचिकाकर्त्यांचे वकील शरद सिन्हा यांनी सीबीआयच्या चौकशीवर संशय व्यक्त केला आहे. या खटल्यातील प्रमुख साक्षीदार असलेल्या बदामी देवी यांचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट सीबीआयने 24 मे राजी न्यायालयासमोर सादर केला होता. बदामी यांच्याशी संपर्क न करताच सीबीआयने त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे सीबीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा अशाप्रकारे तपास कसा काय करू शकते, असा सवालही सिन्हा यांनी केला आहे.

(हेही वाचाः ‘आपका मुसेवाला होगा’, सलमान खानला वडिलांसह जीवे मारण्याची आली धमकी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.