भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली! 22 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती

54

उत्तराखंडमधील देहराडून येथील उत्तरकाशी येथे रविवारी भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळून झालेल्या या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये एकूण 40 भाविक प्रवास करत होते. इतर 6 भाविक गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

22 जणांचा मृत्यू

यमुनोत्री येथे जाणारी ही बस मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून आली होती. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील डामटा येथे 200 मीटर खोल दरीत रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही बस कोसळली. या बसमधून प्रवास करणारे सर्व भाविक हे मध्यप्रदेशातील असल्याचे समजत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला असून, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.

(हेही वाचाः पर्यावरणदिनी विदर्भ तापला; पारा ४६ अंशाच्या पार)

अमित शहांनी व्यक्त केले दुःख

या दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत दुःखद आहे. याबाबत आपण उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफकडून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. तसेच लवकरच एनडीआरएफची तुकडी देखील घटनास्थळी पोहोचेल अशी माहिती धामी यांनी दिल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः सांगलीत भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.