America : मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार, ९ जण जागीच ठार

अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील एलन येथील डलास मॉलमध्ये काही अज्ञात माणसांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला.

149
America : मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार, ९ जण जागीच ठार

अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील एलन येथील डलास मॉलमध्ये काही अज्ञात माणसांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार शनिवार ६ मे रोजी स्थानिक वेळेनुसार ३.४० वाजता हा प्रकार घडला. दिसेल त्याला गोळी घालण्यास सुरुवात केल्याने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली. या गोळीबारात सातजण जखमी झाले आहेत. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन या हल्लेखोरांना कंठस्नान घातल्याचं सांगितलं जात आहे.

https://twitter.com/krassenstein/status/1654979032876761088

(हेही वाचा – दररोज ३ ते ५ कोटींची उलाढाल करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अटक)

एलन पोलिसांनी (America) आपल्या ट्विटर हँडलवरून या हल्ल्याची माहिती दिली आहे. सध्या या गोळीबाराची चौकशी सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

हेही पहा – 

या हल्ल्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोळीबार सुरू होताच लोक मॉलमध्ये घाबरून पळताना दिसत आहेत. लोक शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये आश्रय घेताना दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडला गोळीबाराचे मोठमोठे आवाज ऐकायला येत आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार एलन प्रीमियम आऊटलेट डलासच्या उत्तरेकडील एक आऊटडोअर मॉल आहे. (America)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.