Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी बदनामी केली – राज ठाकरे

शनिवार ६ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची जाहीर सभा संप्पन झाली.

159
Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी बदनामी केली - राज ठाकरे

शनिवार ६ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची जाहीर सभा संप्पन झाली. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरे, राज्य सरकार, शरद पवार, अजित पवार यांवर टीका करत बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवला. ‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी बदनामी केली’ अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली.

(हेही वाचा – Raj Thackeray : बारसू प्रकरणी राज ठाकरे सरकारवरच बरसले; म्हणाले…)

काय म्हणाले राज ठाकरे?

अरबी समुद्रात होणाच्या महाराजांच्या स्मारकाला राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून विरोध होत आहे असं राष्ट्रवादी म्हणत होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी बदनामी केली. राज ठाकरे शिवछत्रपतींचं स्मारक बांधायला विरोध करेन का? असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे म्हणाले; “शिवछत्रपतींचं नाव शरद पवार घेत नव्हते. त्यांनी पसरवायला सुरुवात केली की राज ठाकरे कसा शिवछत्रपतींच्या स्मारकाला विरोध करतो आहे. किती पुतळे आहेत महाराजांचे महाराष्ट्रात? जयंती आणि पुण्यतिथीला हार घालण्यापुरतंच आपलं कर्तव्य उरतं. शिवछत्रपतींनी जे उभं केलं आहे त्यातलं आपण पुढच्या पिढीला काय दाखवणार आहोत? त्यामुळे मी म्हटलं होतं की शिवछत्रपतींचा पुतळा समुद्रात उभा करणार, त्याला १० हजार कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांचे गड-किल्ले दुरुस्त करा. हे बोलणारा एकटा मी होतो. लोकांना वाटलं माझा स्मारकाला विरोध आहे. माझा स्मारकाला विरोध नाही. मात्र छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले हीच खरी स्मारकं आहेत. पुढच्या पिढ्यांना काय पुतळे दाखवणार का? त्यामुळे मी बोललो होतो. इतकं वैविध्य असलेलं आपलं कोकण इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काही घेणं देणं नाही असंही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलं आहे. तसंच सत्ताधाऱ्यांना या गोष्टीशी घेणंदेणं नाही” असंही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.