Mobile recharge देणार मोठा दणका; Airtel, Jio, VI, Idea कंपन्यांचे असे असतील नवे दर

107

वाढत्या महागाईत दूरसंचार सेवा पुन्हा एकदा महाग होऊ शकतात. काही महिन्यांपासून सतत सुरु असलेल्या दरवाढीमुळे तीन खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांची एकूण ग्राहक संख्या तब्बल 3 कोटी 7 लाखाने कमी झाली आहे. अशा परिस्थितीत कंपन्या मोबाईलचा रिचार्ज आणखी महाग करण्याचा विचार करत आहेत.

क्रिसिल अहवालानुसार, ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान, Jio ने आपल्या एका प्लॅनची किंमत तब्बल 150 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे कंपनीचा एक प्लॅन 479 रुपयांवरुन 899 रुपयांवर पोहोचला आहे.

( हेही वाचा: उत्तम लाईफ इन्शुरन्स हवाय? तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा )

लवकरच होणार वाढ

Jio, VI आणि Airtel या कंपन्यांच्या रिचार्जमध्ये 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. Airtel, Jio, Vodafone आणि Idea या कंपन्या एआरपीयूमध्ये 200 रुपये, 185 आणि 135 रुपयांची वाढ करण्याची शक्यता आहे. Recharge मध्ये होणारी वाढ ही येत्या 3 ते 4 महिन्यांत होण्याची शक्यता आहे. Airtel, VI आणि Jio या कंपन्यांनी मागच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये रिचार्जमध्ये वाढ केली होती.

( हेही वाचा: Operation Blue Star: जेव्हा भारतीय सैन्याचे रणगाडे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शिरले )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.