साता-यातील ट्रेकर्सच्या बसचा अपघात; ८ ते १० जण जखमी

95

मनालीमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेल्या साता-यातील ट्रेकर्सच्या बसचा अपघात झाला आहे. प्रशिक्षण संपवून परत येत असताना, पहाटे साडे चारच्या दरम्यान मंडी परिसरात हा अपघात घडला आहे. साता-यातून गेलेले 51 ट्रेकर्स सुखरुप आहेत, मात्र 8 ते 10 जणांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्हा प्रशासनाकडून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जखमी आणि इतर ट्रेकर्सना महाराष्ट्रात परत आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

( हेही वाचा: भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली! 22 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.