स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर राज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींची गर्दी

142

संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा तारखेनुसार सोमवारी 6 जूनला किल्ले रायगडवर होणार आहे. दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होतो. यंदाही या सोहळ्यानिमीत्त रायगडावर शिवप्रेमींची गर्दी आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा नीट साजरा करता आला नव्हता, मात्र यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने दणक्यात शिवराज्याभिषेक साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.

रायगडावरील सुविधा

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रायगडावर जल्लोष, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतीषबाजी पाहायला मिळणार आहे. रविवारपासून रायगडावर या सोहळ्याची लगबग सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत शिवप्रमींसाठी रायगडावर करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली होती. गडावर अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह याचबरोबर निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा, अन्नछत्र उभारण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.

( हेही वाचा: १ लाख बळी घेणाऱ्या वादळाने हादरला होता ‘बॉम्बे’ इलाखा )

वाहनांच्या पार्किंगसाठी खास सुविधा 

पोलिसांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणा-या लोकांची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला मार्ग हा सातारा- कोल्हापूरकडून येणार आहे. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड मार्गे स्वत: ची वाहने घेऊन येणा-या शिवप्रेमींसाठी कोंझर-1 आणि कोंझर- 2 इथे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.