Chhattisgarh Naxalite: छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

71
Chhattisgarh Naxalite: छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा-सीआरपीएफचे एलिट युनिट) यांची स्वतंत्र पथके नक्षलविरोधी कारवाईसाठी बाहेर पडली असताना किस्ताराम पोलीस स्टेशन परिसरातील जंगलात ही चकमक झाली. (Chhattisgarh Naxalite)

सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण जी. चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे ४५० किमी अंतरावर असलेल्या जंगलात नक्षलवादी आणि डीआरजी पथकामध्ये गोळीबार झाला. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळावरून एका नक्षलीचा मृतदेह आणि एक शस्त्र जप्त करण्यात आले असून परिसरात शोधमोहीम अद्याप सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. (Chhattisgarh Naxalite)

(हेही वाचा – Babar Azam Record : बाबर आझम बनला टी-२० च्या इतिहासातील सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज )

वेगवेगळ्या चकमकीत ८१ नक्षलवादी मारले गेले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसह यावर्षी आतापर्यंत सुकमासह ७ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर भागात झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ८१ नक्षलवादी मारले गेले आहेत. १६ एप्रिलला या भागातील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.