Aditya Thackrey : बाळासाहेब माझा “आज्या”…!

बाळासाहेब ठाकरे यांना आदित्य ठाकरेंची काव्यमय आदरांजली

67
Aditya Thackrey : बाळासाहेब माझा
Aditya Thackrey : बाळासाहेब माझा "आज्या"...!
मी भाग्यवान आहे की, जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे … बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन, अशा काव्यमय शब्दात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ठाकरे गटाचे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन असून विविध स्तरातून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. आज त्यांच्या स्मृतीदिनी माजी पर्यावरण मंत्री आणि बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी ट्विटरवर खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आदित्य म्हणातात,
आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात ‘स्पेशल’ असतं…
त्यात आदर असतोच,
पण मैत्री जास्त असते…
धाक असतोच,
पण प्रेम जास्त असतं…
वयाचं अंतर असतंच,
पण मन जवळ असतं….
आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो… त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही!
मी भाग्यवान आहे की, जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे … बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.