Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी करावी ? 

कार्तिकी एकादशीपासून पुढे शुभ मुहूर्ताची सुरुवात होत असते. याच दिवशी तुळशी विवाहसुद्धा पार पडतो. घरोघरी तुळशीच्या रोपाचे शाळीग्रामासह लग्न लावले जाते.

11
Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी करावी ? 
Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी करावी ? 

कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशी ही कार्तिकी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हणून ओळखली जाते. (Dev Uthani Ekadashi 2023) या एकादशीला चातुर्मास संपतो. आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले भगवान महाविष्णू या एकादशीला पुन्हा निद्रेतून बाहेर येतात, असेही मानले जाते.

कार्तिकी एकादशीपासून (Kartiki Ekadashi) पुढे शुभ मुहूर्ताची सुरुवात होत असते. याच दिवशी तुळशी विवाहसुद्धा पार पडतो. घरोघरी तुळशीच्या रोपाचे शाळीग्रामासह लग्न लावले जाते. यंदा अधिक श्रावण आल्याने सगळ्याच सणांच्या तारखा या पुढे गेल्या आहेत. यंदा कार्तिकी एकादशी कधी साजरी करावी, कार्तिकी एकादशीचे व्रत कसे करावे, यंदाचे शुभ मुहूर्त याविषयी जाणून घेऊया.

(हेही वाचा – Jayakwadi water Issue : मराठवाड्यातील पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा रास्तारोको)

देवउठनी एकादशी 2023 कधी ?

यंदा कार्तिकी एकादशीची तिथी २२ नोव्हेंबर रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी सुरु होणार आहे, तर २३ नोव्हेंबरच्या म्हणजेच गुरुवारी रात्री ९ वाजून १ मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होईल. सूर्योदयानुसार देवउठनी एकादशी ही २३ नोव्हेंबरला असणार आहे. (Dev Uthani Ekadashi 2023)

शुभ मुहूर्तांचा शुभारंभ

देवउठनी एकादशी म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून यंदाच्या वर्षातील सर्व शुभ मुहूर्त सुरु होणार आहेत. पंचांगानुसार यानंतर लग्न, मुंज, गृहप्रवेश अशा कार्यक्रमांसाठी २३ नोव्हेंबरच्या नंतर अनेक शुभ मुहूर्त आहेत.

(हेही वाचा – Visakhapatnam Port Fire : विशाखापट्टणम मासेमारी बंदरात सिलिंडरचा स्फोट, ‘इतक्या’ लाख रुपयांच्या बोटी नष्ट)

देवउठनी एकादशीच्या दिवशी होणारे राजयोग

२३ नोव्हेंबरला म्हणजेच कार्तिकी एकादशीला यंदा ग्रहमानसुद्धा अत्यंत शुभ असल्याचे दिसत आहे. याच दिवशी तीन महत्त्वाचे राजयोगसुद्धा जुळून येणार आहेत. या दिवशी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी रवी योग सुरु होणार आहे. संध्याकाळी ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत हा शुभ योग कायम असणार आहे. यानंतर संध्याकाळी ५ वाजून १६ मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धी योग सुरु होणार असून पुढच्या दिवशी सकाळपर्यंत याचा प्रभाव कायम असणार आहे. (Dev Uthani Ekadashi 2023)

भगवान विष्णुप्रती समर्पित सण

देवउठनी एकादशी ही सर्वांत महत्त्वाच्या आणि पवित्र एकादशींपैकी एक मानली जाते. याला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची पूजा करतात. हा कार्तिक महिन्यात येतो आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे, कारण संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे.

काय करावे ?

या दिवशी लोक सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करतात. यानंतर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित केली जाते आणि पंचामृत, फळे, तुळशीची पाने आणि भोगप्रसाद अर्पण केले जातात. शेवटी, भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा आणि त्यांची आरती श्रद्धेने करा. या दिवशी देवी पार्वती, भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्यासह भगवान विष्णूची पूजा केली जाते. (Dev Uthani Ekadashi 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.