Jayakwadi water Issue : मराठवाड्यातील पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा रास्तारोको

या रास्तारोकोमुळे जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.  

20
Jayakwadi water Issue : मराठवाड्यातील पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा रास्तारोको
Jayakwadi water Issue : मराठवाड्यातील पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा रास्तारोको

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी रोखून धरले आहे. यामुळे मराठवाड्यातील जनतेमध्ये संताप आहे. सोमवारी (२० नोव्हेंबर) सकाळी सिंचन भवनसमोर जालना रोडवर हक्काचे पाणी सोडावे या मागणीसाठी सर्वपक्षीय  रास्तारोको करण्यात आला होता. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संघटना सहभागी झाल्या होत्या. या रास्तारोकोमुळे जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.   (Jayakwadi water Issue)

यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, मराठवाड्यातील जनतेला राज्य सरकारने गृहीत धरू नये. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतोय हे पाणी १५ ते २० सप्टेंबर दरम्यान सोडणे आवश्यक होते. मात्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकर्ते संचालकांनी ३० ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन २० दिवस उलटले तरी अद्याप ८.६ टीएमसी  पाणी दिले गेले नाही.आता शांत बसणार नाही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाण्याची गरज आहे. असे असताना अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मुद्दामून आपले पाणी रोखून धरले याचा फटका गोरगरीब जनता शेतकरी उद्योजक यांना बसणार आहे. यामुळे आम्ही आता शांत बसणार नाही, असा इशारा आमदार संजय शिरसाठ यांनी दिला.  (Jayakwadi water Issue)

(हेही वाचा : PMFME Scheme : नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया करणारी योजना शेतकऱ्यांच्याच फायद्याची ,कसा करायचा अर्ज?)

जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतला. आंदोलनात सहभागी नेत्यांची पाणीप्रश्नावर एकजूट दिसून आली. या  आंदोलनात  माजी मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाठ, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिल पटेल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे ,अण्णासाहेब माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार किशोर पाटील ,माजी आमदार नामदेव पवार, अमरसिंह पंडित,  बदामराव पंडित, माजी महापौर नंदकूमार घोडेले, उद्योजक अर्जुन गायके, मसीआ संघटनेचे पदाधिकारी पाणी हक्क परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. (Jayakwadi water Issue)

पाणी सोडू नये अशी आमची भूमिका नाही. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी याचे राजकारण करू नये. यावेळी मराठवाड्याने पाणी सोडण्याचा हट्ट धरू नये, आमची परिस्थिती सुद्धा वाईट आहे, – राधाकृष्ण विखे पाटील ,महसूल मंत्री

दरम्यान आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळाले पाहिजे, जो नियम ठरला त्यानुसार पाणी सोडण्याचं ठरलं आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्यात काही अर्थ नाही. – रावसाहेब दानवे , केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.