Visakhapatnam Port Fire : विशाखापट्टणम मासेमारी बंदरात सिलिंडरचा स्फोट, ‘इतक्या’ लाख रुपयांच्या बोटी नष्ट

मासेमारी बंदराला भीषण आगून मोठा अपघात झाला. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की, बंदरात उभ्या असलेल्या मासेमारीच्या 40 यांत्रिक बोटी जळून खाक झाल्या.

13
Visakhapatnam Port Fire : विशाखापट्टणम मासेमारी बंदरात सिलिंडरचा स्फोट, 'इतक्या' लाख रुपयांच्या बोटी नष्ट
Visakhapatnam Port Fire : विशाखापट्टणम मासेमारी बंदरात सिलिंडरचा स्फोट, 'इतक्या' लाख रुपयांच्या बोटी नष्ट

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे मासेमारी बंदरात मोठी दुर्घटना घडली आहे. (Visakhapatnam Port Fire) सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी मासेमारी बंदराला भीषण आगून मोठा अपघात झाला. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की, बंदरात उभ्या असलेल्या मासेमारीच्या 40 यांत्रिक बोटी जळून खाक झाल्या. रविवारी रात्री उशिरा ही आग लागली. ती सोमवार सकाळपर्यंत धगधगत होती. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. (Visakhapatnam Port Fire)

(हेही वाचा – Indian Air Force: भारतीय हवाई दलाकडून अज्ञात वस्तूच्या शोधासाठी २ राफेल लढाऊ विमाने पाठवली, वाचा पुढे काय झालं…)

स्थानिकांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, एका बोटीत सिलिंडरचा स्फोट झाला. तो इतर नौकांमध्येही पसरला. ज्या बोटीला आग लागली, त्या बोटीभोवती इतर बोटी रांगेत उभ्या होत्या. बहुतांश बोटी लाकडापासून बनविलेल्या होत्या. त्यामुळे आग वेगाने पसरली.

या आगीचे कारण एलपीजी सिलिंडरचा स्फोट असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटाचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू आला. या घटनेत सुमारे 25 बोटी जळून खाक झाल्या. एलपीजी सिलिंडरचा स्फोट कसा झाला, याचा तपास केला जात आहे. (Visakhapatnam Port Fire)

(हेही वाचा – 10th-12th Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरमिसळ परीक्षा पद्धत, कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचा निर्णय)

या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 40 मासेमारी बोटींचे नुकसान झाले. प्रत्येक बोटीची किंमत किमान 40 लाख रुपये आहे. विशाखापट्टणम पोलीस आयुक्तांनी सांगितले की, जेव्हा बोटीला आग लागली तेव्हा उर्वरित बोटी वाचवण्यासाठी ती काढून टाकण्यात आली. जोरदार वाऱ्यामुळे आजूबाजूच्या बोटींना आग लागणे सुरूच राहिले. पोलीस आयुक्तांनी दावा केला की, बोटींमध्ये डिझेलने भरलेले कंटेनर होते. ज्यामुळे आग लागली. प्रभावित मच्छिमारांचे म्हणणे आहे की, ते या बोटींच्या मदतीने स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी वापरत असत. (Fire in Visakhapatnam Port)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.