विचित्र अपघातांची मालिका सुरूच! धुळ्यात ७ गाड्या धडकल्या, तिघांचा मृत्यू

62
दोन दिवसांपूर्वी बुलडाणा येथे ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला होता, त्याआधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ६ वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. अशा प्रकारे विचित्र अपघातांची मालिका थांबता थांबेना. कारण धुळ्यात गुरुवारी पहाटे ७ वाहनांचा विचित्र अपघात झाला, त्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका कारचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. धुळे जिल्ह्यातील बिजासनी घाट ते पळासने याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. अपघातात गाड्या एकमेकांवर आदळल्याने जखमींना गाडीतून बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला असल्याचे प्राथमिक माहितीनुसार बोलले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात विचित्र अपघात

२६ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखली खामगाव मार्गावरील वैरागड येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला होता. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित सातही जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.