कोकण रेल्वे मार्गावर २१ जूनला ३ तासांचा मेगाब्लॉक

116
कोकण रेल्वे मार्गावर २१ जूनला ३ तासांचा मेगाब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावर २१ जूनला ३ तासांचा मेगाब्लॉक

रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर येत्या २१ जून रोजी तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रत्नागिरी ते सिंधुदुर्गातील वैभववाडी दरम्यान सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

(हेही पहा – मुंबई-मडगाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ २६ जूनपासून धावणार)

मेगाब्लॉकमुळे गाडी क्र. ११००३ दादर–सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा २१ जून रोजी सुरू होणारा प्रवास रोहा–रत्नागिरी विभागादरम्यान अडीच तासांसाठी नियंत्रित केला जाईल. त्याआधी २० जून रोजी सुटणारी गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल–लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्स्प्रेस उडुपी ते कणकवली विभागादरम्यान तीन तासांसाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल. गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी आणि कणकवली स्थानकांच्या दरम्यान अर्धा तास नियंत्रित केली जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.