मुंबई-मडगाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ २६ जूनपासून धावणार

160
मुंबई-मडगाव 'वंदे भारत एक्स्प्रेस' २६ जूनपासून धावणार
मुंबई-मडगाव 'वंदे भारत एक्स्प्रेस' २६ जूनपासून धावणार

ओडिशामधील रेल्वे अपघातामुळे मडगाव-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सेवेचा प्रारंभ लांबणीवर पडला होता. आता ही सेवा येत्या २६ जूनपासून सुरू होणार आहे.

ही सेवा गेल्या ५ जूनपासून सुरू होणार होती. मात्र तत्पूर्वीच बालासोरमध्ये झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे उद्घाटन समारंभ रद्द करण्यात आला. आता येत्या २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवशी पाच नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. यासाठी ते भोपाळमध्ये उपस्थित राहणार आहेत. भोपाळमधून दोन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होणार आहेत. त्यासह इतर तीन ठिकाणांहून सुरू होणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. मुंबई-मडगाव, बंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर या त्या पाच गाड्या आहेत. या पाचही गाड्यांना ८ डबे असतील. गाडीतून एकावेळी ५३० प्रवासी प्रवास करू शकतात.

(हेही वाचा – Biparjoy Cyclone: गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू २२ जखमी)

मुंबई-मडगाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि खेड येथे थांबा देण्यात आला आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता सुटेल. ठाणे ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, मडगाव दुपारी १.२५ अशा तिच्या वेळा असतील. मडगाव येथून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ दुपारी २.३५ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ ५.३५ आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता सहा दिवस धावणार असली, तरी मान्सूनच्या काळात ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.