Manipur Violence: मणिपूरच्या इन्फाळमध्ये पुन्हा हिंसाचार; केंद्रीय मंत्र्याचे जाळले घर

197
Manipur Violence: मणिपूरच्या इन्फाळमध्ये पुन्हा हिंसाचार; केंद्रीय मंत्र्याचे जाळले घर
Manipur Violence: मणिपूरच्या इन्फाळमध्ये पुन्हा हिंसाचार; केंद्रीय मंत्र्याचे जाळले घर

मणिपूरच्या इन्फालमध्ये गुरुवारी रात्री केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांचं घर जाळलं. माहितीनुसार, या घटनेच्या वेळीस केंद्रीय मंत्री घरात नव्हते. एवढेच नाहीतर न्यू चेकऑन येथील दोन घरेही हल्लेखोरांनी जाळली. त्यानंतर सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. यापूर्वी १४ जून रोजी अज्ञात लोकांनी इन्फाळच्या लामफेल परिसरात राहणाऱ्या मणिपूरच्या एकमेव महिला मंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत निवासस्थानालाही आग लावली होती.

मणिपूरमधील हा हिंसाचार संपण्याचं काही नावचं घेत नाहीये. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१३ जून) अचानक झालेल्या गोळीबारात ९ जण ठार झाले तर १० जण जखमी झाले. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांनाही आग लावली. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंग येथेही अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – Biparjoy Cyclone: गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू २२ जखमी)

सध्याची मणिपूरमधील परिस्थिती…

मणिपूरमधील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण आहे. राज्यातील १६ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू आहे, तर इंटरनेट सेवाही बंद आहेत. एवढेच नाही तर मूलभूत गरजांसाठीही लोकांना संघर्ष करावा लागत आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये गेल्या महिनाभराहून अधिक काळ शांततेसाठी सातत्याने प्रयत्न केले जात असले तरी सर्व प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये एक महिन्यापूर्वी मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात १०० हून अधिक लोकांचा जीव गेला आणि ३१० जण जखमी झाले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.