AN-32 Aircraft : साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे अवशेष सापडले

AN-32 Aircraft : एएन-32 चे अवशेष बंगालच्या उपसागरात साडेतीन किलोमीटर खोलवर सापडले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT)ने या विमानाचा शोध लावला आहे.

202
AN-32 Aircraft : साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे अवशेष सापडले
AN-32 Aircraft : साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे अवशेष सापडले

भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) विमान 22 जुलै 2016 रोजी बेपत्ता झाले होते. आता त्या विमानाचे अवशेष बंगालच्या उपसागरात सापडले आहेत. साडेसात वर्षांपूर्वी 29 सैनिकांना घेऊन जाणारे हवाई दलाचे एएन-32 (AN-32 Aircraft) विमान अचानक बेपत्ता झाले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्याचे अवशेष बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) साडेतीन किलोमीटर खोलवर सापडले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT)ने या विमानाचा शोध लावला आहे.

(हेही वाचा – BMC : येत्या फेब्रुवारीमध्ये क्लिन अप मार्शल रस्त्यावर; करणार ऑनलाईन दंडाची रक्कम वसूल)

एका मोहिमेदरम्यान बंगालच्या उपसागरावरून जात असताना हे विमान अचानक बेपत्ता झाले होते. या घटनेच्या वेळी विमानात हवाई दलाचे 29 सैनिक होते. त्यांचेही पुढे काय झाले, ते कळले नव्हते. या घटनेनंतर विविध विमान आणि जहाजांद्वारे मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम राबवण्यात आली. तरीही कुणाच्याच हाती काही काही लागले नाही.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (National Institute of Ocean Technology, NIOT) या संस्थेला या विमानाचे अवशेष सापडले आहेत. यासाठी संस्थेने विमान बेपत्ता झाले, त्या ठिकाणी समुद्रात ऑटोमॅटिक अंडरवॉटर व्हेईकल (AUV, Automatic Underwater Vehicle) तैनात केले होते. या व्हेईकलने समुद्रात 3400 मीटर खोलीवर शोध घेतला. या मोहिमेत मिळालेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचे अवशेष आढळले आहेत. (AN-32 Aircraft)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.