
-
प्रतिनिधी
Ravindra Waikar कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेचा प्रवास पुन्हा एकदा सुसह्य करण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी कंबर कसली आहे. ही लोकप्रिय रेल्वे सेवा पुन्हा एकदा दादर स्थानकापर्यंत सुरू करावी आणि शक्य असल्यास तिचा विस्तार थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत करावा, अशी आग्रही मागणी वायकरांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Ravindra Waikar)
(हेही वाचा – सिलिंडर बुकिंगची कटकट संपली; विना गॅस कनेक्शन असा मिळणार Indane Chhotu Cylinder )
कोविड काळापूर्वी ही गाडी गेल्या २५-३० वर्षांपासून दादरवरून नियमितपणे सुटत होती. मात्र, लॉकडाऊननंतर रेल्वे प्रशासनाने ही सेवा केवळ दिवा स्थानकापर्यंत मर्यादित केली. यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कष्टकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांना दिव्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोकलचा अतिरिक्त प्रवास करावा लागत असून, वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Ravindra Waikar)
(हेही वाचा – IPL 2026 : सुर्यवंशीला भारतीय संघात घ्यायला रविचंद्रन अश्विनचा ठाम विरोध)
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था पाहता, कोकणच्या जनतेसाठी ही पॅसेंजर रेल्वे अत्यंत सुरक्षित आणि स्वस्त पर्याय आहे. यापूर्वी १० जानेवारी २०२५ रोजी वायकरांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता, मात्र रेल्वे विभागाकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे चाकरमान्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे वायकरांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. जर ही गाडी सीएसएमटीपर्यंत विस्तारित झाली, तर दक्षिण मुंबईतील प्रवाशांना थेट आपल्या गावी जाणे सोपे होईल. आता रेल्वे मंत्रालय कोकणवासीयांच्या या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ravindra Waikar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
