IPL 2026 : सुर्यवंशीला भारतीय संघात घ्यायला रविचंद्रन अश्विनचा ठाम विरोध

१५ वर्षीय सुर्यंवंशीला राष्ट्रीय संघात घ्यावं का यावरून वाद सुरू आहे.

108
IPL 2026 : सुर्यवंशीला भारतीय संघात घ्यायला रविचंद्रन अश्विनचा ठाम विरोध
IPL 2026 : सुर्यवंशीला भारतीय संघात घ्यायला रविचंद्रन अश्विनचा ठाम विरोध
  • ऋजुता लुकतुके

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi) झंझावाती फलंदाजीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्याच सामन्यात वैभव सुर्यवंशीने पुन्हा एकदा आपली छाप पाडली. त्यानंतर त्याला जलद गतीने भारतीय संघात घ्यावं का यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि मायकल वॉन (Michael Vaughan) यांसारख्या माजी खेळाडूंनी त्याला आयपीएलनंतर लगेच भारतीय राष्ट्रीय संघात संधी द्यावी, असे मत व्यक्त केले आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड व्हावी या मताचे काही क्रिकेटपटू आहेत. (IPL 2026)

मात्र, भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला की, सूर्यवंशी अजून खूप लहान आहे आणि त्याच्यावर लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दबाव टाकू नये. “तो अजून मुलगा आहे. जर एमएस धोनी (MS Dhoni) ४४-४५ वयापर्यंत खेळू शकतो, तर सूर्यवंशीकडे अजून दोन दशकांहून अधिक क्रिकेट शिल्लक आहे. योग्य वेळ आल्यावर तो आपोआप भारतीय संघात येईल,” असे अश्विनने स्पष्ट केले. (IPL 2026)

सूर्यवंशीने आतापर्यंत ज्या-ज्या संघांसाठी खेळला, तिथे त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. १४ व्या वर्षीच टी-२० लीगमध्ये शतक करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. तसेच भारत अंडर-१९ आणि ‘ए’ संघासाठी खेळताना त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. (IPL 2026)

(हेही वाचा – West Asia Tensions : पंतप्रधान मोदींची नेदरलँड्सच्या पंतप्रधानांशी चर्चा; ‘या’ क्षेत्रांत वाढणार सहकार्य)

गुवाहाटीतील कठीण खेळपट्टीवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावत सर्वांना थक्क केले. अश्विननेही त्याच्या फलंदाजीचे कौतुक करताना त्याचा वेग आणि फटक्यांची निवड यांचा विशेष उल्लेख केला. “त्याच्याकडे अप्रतिम टायमिंग आणि वेग आहे. त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ दिसत होते,” असे तो म्हणाला. (IPL 2026)

अशा प्रभावी खेळामुळे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यंदाच्या हंगामात विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात, असा विश्वासही अश्विनने व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.