Western Railway : ब्लॉक संपला, सोमवारपासून पश्चिम रेल्वे रुळावर

127
Western Railway : ब्लॉक संपला, सोमवारपासून पश्चिम रेल्वे रुळावर
Western Railway : ब्लॉक संपला, सोमवारपासून पश्चिम रेल्वे रुळावर

पश्चिम रेल्वेवर खार – गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी घेण्यात येत असलेल्या ब्लॉकचा रविवार अखेरचा दिवस होता . रविवारी ११० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या . परंतु, सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील फेऱ्या पूर्ववत केल्या जाणार आहेत. तसेच लवकरच सहावी मार्गिका प्रवासी सेवेत येणार आहे. अशी माहिती रेल्वेने दिली होती त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Western Railway)

पश्चिम रेल्वेवर २९ दिवस ब्लॉक घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले. हे काम खार ते गोरेगावदरम्यान सुरू असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक महत्त्वाचे काम ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत केले जात असल्याने पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत दिवसाला ३१६ फेऱ्या रद्द करण्याचे नियोजन केले होते.मात्र, दिवाळीच्या तोंडावर प्रवासी घराबाहेर पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रद्द केलेल्या अनेक लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. दरम्यान, शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर ९३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

(हेही वाचा : IND vs SA : सूर्यकुमार यादव की ईशान किशन; ईडन गार्डन्सवर आज कोण खेळणार?)

गेल्या महिन्याभरापासून पश्चिम रेल्वे वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी दरररोज २०० हून अधिक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या . एवढ्या प्रमाणात लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्याने लोकलची संख्या कमी झाली. परिणामी लोकल ट्रेनमधून प्रवास करणे जिकरीचे झाले. अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. काही ठिकाणी चेंगराचेंगरी सदृष्य स्थितीदेखील निर्माण झाली होती. अनेकांनी लोकल ट्रेन ऐवजी खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारल्याने रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.