IND vs SA : सूर्यकुमार यादव की ईशान किशन; ईडन गार्डन्सवर आज कोण खेळणार?

168
IND vs SA : सूर्यकुमार यादव की ईशान किशन; ईडन गार्डन्सवर आज कोण खेळणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे (IND vs SA) संघ आज म्हणजेच रविवार ५ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्सवर आमने सामने येतील तेव्हा खरी वर्चस्वाची लढाई होईल. गुणतालिकेतील अव्वल संघ आज एकमेकांना भिडणार आहेत. अशातच भारतीय संघाचे आजचे ११ शिलेदार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता (IND vs SA) टीम इंडिया आपल्या प्लेइंग-११ मध्ये बदल करू शकते. अशातच आता ईशान किशनला संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. असे झाल्यास श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांना बाहेर बसावे लागू शकते.

दरम्यान इंडियन टीममध्ये (IND vs SA) सध्या श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे एकमेव फलंदाज आहेत ज्यांना संघातून वगळले जाऊ शकते. ते बाहेर गेल्यास रविचंद्रन अश्विन किंवा शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. दोघेही गोलंदाजीबरोबर थोडीफार फलंदाजीही करू शकतात. त्याचबरोबर मधल्या फळीत इशान किशनलाही संधी दिली जाऊ शकते. कारण, भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि संघ व्यवस्थापन याच पार्श्वभूमीवर ईशानलाही संधी देऊ इच्छित आहे. जेणेकरून गरज पडल्यास उपांत्य आणि अंतिम सामन्यांपूर्वी त्याला सामन्याचा सराव होईल.

(हेही वाचा – Israel Hamas War : दक्षिण गाझामध्ये इस्त्रायली सैन्याची घुसखोरी)

पाऊस पडला तर काय होईल?

आजच्या मॅचमध्ये (IND vs SA) पाऊस पडल्यास सामन्यातील षटके कमी होऊ शकतात. त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण सामना पाहता येणार नाही. त्याचवेळी पावसामुळे सामना रद्द होऊन दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाऊ शकतो. स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये राखीव दिवसाचा नियम आहे.

आफ्रिकन संघ (IND vs SA) नेदरलँड्सने दिलेल्या धक्क्यानंतर चवताळून उठलाय. सातत्याने ३५० च्या वर धावा करतोय. क्विंटन डी कॉक, व्हॅन देअर मर्व्ह, क्लासेन लिलया षटकार ठोकतायत. ते फक्त धावाच करत नाहीएत तर खेळाचा नूर पालटणारी खेळी रचतायत. त्यामुळे कागदावर पाहिलं तर या लढतीचं स्वरुप दक्षिण आफ्रिकन फलंदाजी वि. भारतीय गोलंदाजी असंच असणार आहे.

भारतीय संघाच्या (IND vs SA) बाबतीत असं पहिल्यांदा होत असेल की, त्यांच्या फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची चर्चा होतेय. हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाद झाला असला तरी जसप्रीत बुमरा, महम्मद शामी आणि महम्मद सिराज यांनी त्याची उणीव जाणवू दिलेली नाही. या घडीला या तिघांमुळे आणि त्यांना कुलदीप आणि जाडेजाकडून मिळणाऱ्या फिरकीच्या साथीमुळे भारतीय गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वोत्तम आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.