Solapur : सोलापूर शहरासाठी २५ डिसेंबरनंतर पाणी सोडले जाणार

137
Solapur : सोलापूर शहरासाठी २५ डिसेंबरनंतर पाणी सोडले जाणार
Solapur : सोलापूर शहरासाठी २५ डिसेंबरनंतर पाणी सोडले जाणार

उजनी धरणातून कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडलेले पाणी १५ डिसेंबरला बंद होईल. २५ डिसेंबरनंतर सोलापूर (Solapur) शहरासाठी भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. पण, यासंबंधीचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीत होईल, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

उजनीवर अवलंबून जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमधूनही जवळपास १० हजार हेक्टरवरील जमिनीला पाणी मिळते. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी उजनीतील पाणीसाठ्यावर लक्ष असते. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि पावसाळा संपला त्यावेळी उजनीत ६६ टक्के पाणीसाठा होता. खरीप हंगामात उजनीतील पाण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पाणी सोडून दिलासा देण्यात आला. आता हे पाणी १५ डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे.

(हेही वाचा – ED Raid : कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी ईडीकडून छापे)

सोलापूर शहरासाठी १ जानेवारीला औजमध्ये पाणी पोहोचेल, यादृष्टीने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे. सध्या औज बंधाऱ्यात २.१५ मीटरपर्यंत पाणीपातळी आहे. त्यामुळे १ जानेवारीपर्यंत औजमध्ये पाणी पोचेल, अशा नियोजनाने पाणी सोडण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.