I.N.D.I. Alliance: बैठकीवरच एकमत नाही, ‘इंडी आघाडी’ची बैठक पुढे ढकलली

175
I.N.D.I. Alliance: बैठकीवरच एकमत नाही, 'इंडिया आघाडी'ची बैठक पुढे ढकलली
I.N.D.I. Alliance: बैठकीवरच एकमत नाही, 'इंडिया आघाडी'ची बैठक पुढे ढकलली

देशातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी २६ पेक्षा जास्त पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडी आघाडी स्थापन’ केली, (India Bloc Meeting) पण बैठक कधी घ्यायची यावरच एकमत नसल्यामुळे अखेर ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंडी आघाडीची बैठक बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली होती, मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेच्या सूत्रांकडून देण्यात आलं आहे.

(हेही वाचा – J&K Reorganisation Bill 2023 : गृहमंत्री अमित शाह लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक-2023 सादर करणार )

इंडिया आघाडीतील सर्व पक्षांची उपलब्धता लक्षात घेऊन ही बैठक बोलावण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप इंडिया आघाडीकडून अधिकृतरित्या या विषयाबाबत कोणाही बोललेलं नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.