पुणेकरांनो! पाणी जपून वापरा, ‘या’ भागात गुरुवारी २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

126

पुण्यातील वारजे जलकेंद्र अखत्यारित गांधी भवन टाकी आणि चांदणी चौक टाकीच्या मुख्य जलवाहिनीला फ्लो मीटर बसविण्याचे काम; तसेच अन्य कामे गुरुवारी (१० नोव्हेंबर) करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंत वारजे जलकेंद्रांतर्गत भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (११ नोव्हेंबर) सकाळी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

(हेही वाचा – सत्तारांच्या ‘त्या’ विधानानंतर मुंबईत राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शासकीय निवासस्थानाच्या काचा फोडल्या)

या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॅलनी, सिल्पा फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्ह्यू, गार्डन सिटी, पाॅप्युलर काॅलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य काॅलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी परिसर, सहजानंद, शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन ७ आणि ९, मुंबई पुणे बाह्यवळण दोन्ही बाजू, शेरवाती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरिश सोसायटी, तिरूपती नगर, कुलकर्णी हाॅस्पिटल सोसायटी, हिंगणे होम काॅलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, पाषाण भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सॅटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, बावधन परिसर, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, गुरू गणेशनगर, सूरजनगर, सागर काॅलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहननगर, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.