Vijay Singhal : तोट्यातील बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची धुरा विजय सिंघल यांच्या हाती!

सिंघल यांनी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज केल्याने बेस्ट उपक्रमाच्या कामकाजाची चांगल्या प्रकारे माहिती असल्याने सिंघल हे तोट्यातील बेस्टला नफ्यात आणण्यासाठी कोणत्या कटकसरीच्या उपाययोजनांची अमलबजावणी करतात याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.

306
Vijay Singhal : तोट्यातील बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची धुरा विजय सिंघल यांच्या हाती!

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी ०५ जुन २०२३ रोजी बेस्ट उपक्रमाचे मावळते व्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्विकारला. सिंघल यांनी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज केल्याने बेस्ट उपक्रमाच्या कामकाजाची चांगल्या प्रकारे माहिती असल्याने सिंघल हे तोट्यातील बेस्टला नफ्यात आणण्यासाठी कोणत्या कटकसरीच्या उपाययोजनांची अमलबजावणी करतात याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे. तसेच कडक शिस्तीचे सिंघल हे या बेस्टच्या कारभाराची विस्कटलेली घडी बसवण्यात यशस्वी ठरतात का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

सिंघल (Vijay Singhal) यांनी आयआयटी रुरकी मधून बी.टेक (स्थापत्य अभियांत्रिकी) या विषयात सुवर्णपदक मिळवले आहे. याच बरोबर आयआयटी दिल्ली मधून बिल्डींग सायन्स अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट इमारत विज्ञान आणि बांधकाम व्यवस्थापन या विषयात एम.टेक पदवी संपादित केली आहे.

(हेही वाचा – BMC : डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार)

विजय सिंघल (Vijay Singhal) १९९७ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे व कोल्हापूर महापालिका आयुक्त म्हणून काम केले असून साखर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट आयुक्त, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त व महावितरणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदावरही ते कार्यरत होते.

विजय सिंघल (Vijay Singhal) यांना उत्कृष्ट लोक प्रशासनाकरिता मानाच्या अशा पतप्रधान पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबई शहरात भारतातील सर्वात स्वच्छ राज्याची राजधानी बनविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची नोंद घेत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

साखर आयुक्तालयात ‘साखर आयुक्त म्हणून कार्यरत असताना विजय सिंघल (Vijay Singhal) यांना उत्कृष्ट ई – गव्हर्नसच्या अमलबजावणीकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुवर्ण आणि रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेत केलेल्या तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी माननीय रविशंकर प्रसाद इलेक्ट्रानिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते २०१८ साली डिजीटल इंडिया अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले होता.

हेही पहा – 

न्यूयार्क स्टेट युनिव्हर्सिटी आलबेनी, युएसए व पेनिसेलव्हिया युनिव्हर्सिटी, पेन्ना स्टेट युएसए ” या विद्यापीठात त्यांना नद्याजोड प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. विजय सिंघल (Vijay Singhal) यांना विविध पदावर कार्यरत असताना समाजासाठी योगदान व विशेष सुधारणा घडवून आणल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता व उत्तर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.