Uttarkashi Tunnel Accident : अमेरिकेतील तज्ज्ञांच्यामते कामगारांना बाहेर काढण्यास लागणारं आणखी वेळ

मोठे बोगदे बांधताना आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून सुटकेचे मार्ग तयार करणे आवश्यक असताना तशी काही व्यवस्थाच करण्यात आलेली नाही, असा आरोप होऊ लागला आहे.

87
Uttarkashi Tunnel Accident : अमेरिकेतील तज्ज्ञांच्यामते कामगारांना बाहेर काढण्यास लागणारं आणखी वेळ
Uttarkashi Tunnel Accident : अमेरिकेतील तज्ज्ञांच्यामते कामगारांना बाहेर काढण्यास लागणारं आणखी वेळ

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगदा कोसळल्यानं त्यात ४१ कामगार गेल्या १४ दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.त्यातच इथं बचाव पथकात काम करणारे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ आर्नोल्ड डिक्स यांनी चार दिवसांपूर्वीच या कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं होतं. परंतु,अंतिम खोदकामांत अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे या कामगारांना बाहेर काढण्यास खूप वेळ लागणार असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे बचाव मोहीम आता लांबवली आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. खोदकामासाठी मागवलेल्या अमेरिकन ऑगर मशीन सतत बिघडत आहेत. ही मशीन आतापर्यंत अनेकदा बिघडली आहे. शनिवारी दुपारीदेखील ही मशीन बिघडली असून दुरुस्तीचं काम सुरू आहे. मशीन दुरुस्त करण्यासाठी दिल्लीहून तज्ज्ञांचं पथक उत्तरकाशीत दाखल झालं आहे. खोदकाम करून ३२ इंच रुंदीचा पाइप टाकून या मजुरांना नलिकेच्या मार्गाने बाहेर काढलं जाणार आहे. परंतु, पाइप टाकण्याच्या कामामध्ये गुरुवारपासून (२३ नोव्हेंबर) कोणतीही प्रगती झालेली नाही. असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही जाहीर केले आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

(हेही वाचा : MECB : गोरेगाव मुलुंड रस्ता प्रकल्पाचा मार्ग भांडुपमध्ये ‘एमईसीबी’मुळे अडला)

अडथळ्यांमुळे अनेकदा बचावकार्य ठप्प
एकाच वेळी पाच पातळ्यांवर बचावकार्य सुरू होते. मात्र, अडथळ्यांमुळे अनेकदा बचावकार्य ठप्प झाले. घटनास्थळाचा भाग दुर्गम असल्याने अत्याधुनिक यंत्रसामग्रीची उपलब्धता हे दुसरे मोठे आव्हान होते. देशभरातील अनेक भागांबरोबरच अमेरिकेतून अशी यंत्रे आणण्यात आली, याकडेही यंत्रणांनी लक्ष वेधले आहे. मात्र, मोठे बोगदे बांधताना आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून सुटकेचे मार्ग तयार करणे आवश्यक असताना तशी काही व्यवस्थाच करण्यात आलेली नाही, असा आरोप होऊ लागला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.