MSEB : गोरेगाव मुलुंड रस्ता प्रकल्पाचा मार्ग भांडुपमध्ये ‘एमएसईबी’मुळे अडला

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पूर्व द्रुतगती मार्ग ते खिंडीपाडा पर्यंतचा गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पाच्या कामाला ऑगस्ट २०१८ पासून सुरुवात झाली आहे.

127
MSEB : गोरेगाव मुलुंड रस्ता प्रकल्पाचा मार्ग भांडुपमध्ये ‘एमएसईबी’मुळे अडला
MSEB : गोरेगाव मुलुंड रस्ता प्रकल्पाचा मार्ग भांडुपमध्ये ‘एमएसईबी’मुळे अडला

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प कामांमध्ये एलबीएस मार्ग सोनापूर चौक व तानसा पाईप लाईन या परिसरात रस्ता रुंदीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा (MSEB) अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर (MSEB) ची २२ के. व्ही. क्षमतेची भूमिगत हाय टेन्शन केबल असून ही केबल असून ही केबल वायर दुसऱ्या जागेत हलवली जात नाही तोवर या प्रकल्पाचे काम पुढे सरकणार नाही. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पूर्व द्रुतगती मार्ग ते खिंडीपाडा पर्यंतचा गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पाच्या कामाला ऑगस्ट २०१८ पासून सुरुवात झाली आहे. या कामांसाठी लँडमार्क कॉपोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. (MSEB)

मात्र या प्रकल्पाचे विविध टप्प्यात काम सुरु असून भांडुप सोनापूर चौक एलबीएस मार्ग ते तानसा पाईप लाईन मार्ग या दरम्यान या प्रकल्पातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आराखड्यानुसार हाती घेण्यात येत आहे. परंतु हे काम सुरु असतानाच या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामांमध्ये एमएसईबीचा (MSEB) मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गाच्या आड सध्या एमएसईबीची (MSEB) केबल येत असून या रस्त्याखालून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची २२ केव्ही क्षमतेची भूमिगत हाय टेन्शन वायर तसेच इलेक्ट्रीक पोल, बॉक्सेस या येत आहे. त्यामुळे या केबल वायरसह इलेक्ट्रीक पोल व बॉक्सेस अन्य जागेमध्ये हलवणे आवश्यक असून जोवर ही केबल हटवून अन्य जागेत टाकली जात नाही तोवर या भागातील रस्त्याचे रुंदीकरण करता येणार नाही असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (MSEB)

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : वाचन सुलभता वाढविण्यासाठी पुस्तकांचे डिजिटलायझेशन करा; राज्यपालांचे आवाहन)

पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्युत केबल व पोल अन्य जागेत हलवण्यासंदर्भात एमएसईबीशी (MSEB) चर्चा सुरु असून ही केबल वायर आणि पोल व बॉक्सेस हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च महापालिकेच्यावतीने एमएसईबीला (MSEB) देण्यात येणार आहे. ही रक्कम देण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही विद्युत केबल, पोल हटवण्यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (MSEB)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.