Muslim : शनी मंदिरातला पुजारी निघाला गुल्लू खान; पोलिसांनी केली अटक 

121

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हिंदू संघटनांनी मंदिरात पुजारी म्हणून काम करणारा मुसलमान Muslim निघाला, त्याला रंगेहाथ पकडले आहे. गुल्लू खान असे त्या आरोपीचे नाव असून तो मूळचा हरियाणातील पानिपतचा रहिवासी आहे. गुल्लू खानने याआधीही काही मंदिरांमध्ये नाव बदलले आहे. गुल्लूला मंगळवारी, १८ फेब्रुवारी २०२३ रोजी पकडण्यात आले. पोलीस संशयिताची चौकशी करत आहेत.

हे प्रकरण मेरठच्या मतौर गावाशी संबंधित आहे, येथे एक प्राचीन ओम शनि मंदिर आहे. गुल्लू खान जानेवारी २०२३ मध्ये हरियाणातील सोनीपत येथून आल्यानंतर या मंदिरात पुजारी म्हणून राहत होता. गुल्लूच्या वडिलांचे नाव इस्माईल खान Muslim  मुसलमान आहे. त्याने लोकांना स्वतःची गुर्जरनाथ महाराज अशी ओळख करून दिली. त्याने मंदिराच्या काळजीवाहूंना सांगितले की, तो पूर्वी डिगलबेरी रोड, झज्जर, हरियाणा येथील बाबा गोरखनाथ मंदिराचा पुजारी होता. गुल्लूला मंदिराच्या साफसफाईचे काम देण्यात आले.

(हेही वाचा Bhayandar Building Part Collapsed : भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळून तीन जण जखमी)

अनेक महिन्यांपासून एकाही गावकऱ्याला तो मुस्लिम असल्याचा सुगावा लागला नाही. असे सांगितले जात आहे की एके दिवशी गुल्लूचा एक पूर्वीचा ओळखीचा माणूस कृष्णपाल मंदिरात पोहोचला. कृष्णपालने गुल्लू खानला ओळखले आणि गावकऱ्यांना याची माहिती दिली. हळूहळू ही गोष्ट हिंदू संघटनांपर्यंत पोहोचली. हिंदू संघटनेशी संबंधित लोक मंदिरात पोहोचले. सर्वजण गुल्लू खानच्या अटकेची मागणी करू लागले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुल्लू खानला ताब्यात घेण्यात आले आहे. गुल्लूचे आधार कार्ड तपासले असता तो मुस्लिम असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीदरम्यान गुल्लूने आपण मुस्लिम असल्याचे मान्य केले आहे. याआधी गुल्लू खान कुठे आणि कोणत्या मंदिरात राहत होता, याचाही तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.