Bhayandar Building Part Collapsed : भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळून तीन जण जखमी

133
Bhayandar Building Part Collapsed : भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळून तीन जण जखमी

अतिमुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर येथील एका बिल्डिंगच्या भिंतीचा समोरील भाग कोसळून (Bhayandar Building Part Collapsed) तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवार २० जुलै सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

गेल्या तीन – चार दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, दरड कोसळणे यासारख्या पडझडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मिळालेल्या माहितीनुसार भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग (Bhayandar Building Part Collapsed) कोसळला आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले असून अनेक जण या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या इमारतीत (Bhayandar Building Part Collapsed) अनेक दुकाने आहेत. इमारतीखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरु केले. अग्नीशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्नीशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ बचाव कार्या सुरु केले.

(हेही वाचा – Heavy Rain : रायगडमधील माथेरानमध्ये ४०० मिमी पाऊस तर कोकणातही पावसाचा मारा सुरूच)

सततच्या पावसामुळे इमारत खचण्याचा किंवा कोसळण्याचा धोका अधिक वाढला आहे.

मीरा- भाईंदर येथे भाईंदर रेल्वे स्थानक (पुर्व), तिकीट खिड़की समोरील इमारतीचा (Bhayandar Building Part Collapsed) भाग पडला. यामध्ये 1 व्यक्ती अडकून पडला होता. सदर व्यक्तीस बाहेर काढण्यात अग्निशमन दलास यश आले असून शोधकार्य अद्याप सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.