US Shutdown : अमेरिकेचे प्रचंड नुकसान; लाखोंचा गेला रोजगार, जीडीपी दरही घसरला

189
American flag in front of the US Capitol building
The American flag waves in front of the Capitol building.

१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या अमेरिकन सरकारी बंदचा आज ३६ वा दिवस आहे. (US Shutdown) अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बंद आहे. यापूर्वी २०१८ मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांच्या पहिल्या कार्यकाळात सरकार ३५ दिवसांसाठी बंद पडले होते. आरोग्य सेवा कार्यक्रमासाठी अनुदाने वाढविण्यास ट्रम्प यांच्या अनिच्छेमुळे अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये निधी विधेयक मंजूर होण्यापासून रोखले गेले आहे. या विधेयकावर आतापर्यंत १३ वेळा मतदान झाले आहे; परंतु प्रत्येक वेळी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ६० मतांपेक्षा ते पाच मते कमी पडले. त्यामुळे सुरु झालेल्या या शटडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे.

(हेही वाचा – भारत-अमेरिका संयुक्त ‘Nisar’ उपग्रह 7 नोव्हेंबरपासून होणार कार्यरत; गगनयान चाचणीवर आली मोठी अपडेट)

कर्मचाऱ्यांना रोजगार नाहीत

काँग्रेसनल बजेट ऑफिसच्या अभ्यासानुसार, नुकसान आधीच ११ अब्ज डॉलरपर्यंत (अंदाजे १ लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचले आहे. जर शटडाऊन लवकर संपला नाही, तर चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी १ ते २ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

वॉशिंग्टनस्थित (Washington) बायपार्टिसन पॉलिसी सेंटरचा एक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार आतापर्यंत ६,७०,००० सरकारी कर्मचाऱ्यांना रजेवर काढण्यात आले आहे, तर ७,३०,००० कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय काम करावे लागत आहे. यामुळे अंदाजे १४ लाख लोक त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कर्जावर अवलंबून आहेत.

सीबीओचे संचालक फिलिप स्वॅगेल म्हणाले की, शटडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. हा परिणाम काही प्रमाणात कमी होईल; परंतु पूर्णपणे नाही.

हवाई वाहतुकीवर परिणाम

अमेरिकेतील सरकारी बंदमुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. देशभरातील अनेक विमानतळांवर उड्डाणे उशिराने किंवा रद्द केली जात आहेत. वाहतूक विभागाने इशारा दिला आहे की ११,००० हवाई वाहतूक नियंत्रकांना त्यांचे वेतन मिळालेले नाही आणि जर ही परिस्थिती अशीच राहिली तर हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम होईल.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (Federal Aviation Administration, FAA) नुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स (ATC) प्रचंड ताण आणि थकव्याचा सामना करत आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचारी ड्युटीवर येत नाहीत. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान, अमेरिकेत १६,७०० हून अधिक उड्डाणे उशिरा झाली आणि २,२८२ उड्डाणे रद्द करावी लागली. ३० प्रमुख विमानतळांपैकी निम्म्या विमानतळांवर कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. हवाई वाहतूक नियंत्रकांना आपत्कालीन सेवा मानले जाते, म्हणून ते कामावर येत आहेत, परंतु त्यांना १ ऑक्टोबरपासून त्यांचे वेतन मिळालेले नाही.

अन्नपुरवठा खंडित

या बंदमुळे ४२ दशलक्ष अमेरिकन लोकांना मिळणारी फूड स्टॅम्प मदत थांबली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाकडे या कार्यक्रमासाठी फक्त ५ अब्ज डॉलर्सचा राखीव निधी आहे, तर नोव्हेंबरपर्यंत फूड स्टॅम्प सुरू ठेवण्यासाठी ९.२ अब्ज डॉलर्सची आवश्यकता असेल. (US Shutdown)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.