टोल नाके आता बंद झाले आहेत नवी टेक्नॉलॉजी आणली आहे. पुणे जिल्ह्यात मी 50 हजार कोटी रुपयांचे पूल बनवत आहे, सगळी नवी टेक्नॉलॉजी यात आणली आहे. नवं तंत्रज्ञान वापरून आपल्याला देशाला सक्षम बनवाव लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. कोथरूड येथील एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेच्या वतीने इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन सस्टेनेबल टनेलिंग फॉर बेटर लाइफ म्हणजे चांगल्या जीवनासाठी शाश्वत बोगद्यावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
(हेही वाचा – काँग्रेस नेत्या Sonia Gandhi यांनी लिहिलेल्या लेखानंतर इस्त्रायलने सुनावले खडेबोल; म्हणाले…)
केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून सातत्याने नवसंकल्पना आणि नवतंत्रज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, नवतंत्रज्ञान वापराचा सल्लाही ते देत असतात. देशातील दळणवळण अधिक गतीमान व्हावं आणि प्रवासी, नागरिकांना कमी खर्चात वाहने, इंधन उपलब्ध होण्यासाठीचाही त्यांचा प्रयत्न असतो. आता, पुणे (Pune) येथील आंतरराष्ट्रीय टनेल वर्कशॉप परिषदेत बोलताना त्यांनी टनेल बनविण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.
(हेही वाचा – तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री Pawan Kalyan यांनी दाखविला आरसा)
तर, आता शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टरदेखील आपण इलेक्ट्रिक, इथेनॉलवर चालणारे बनवत आहोत. माझ्या शेतात मी सीएनजी ट्रॅक्टर वापरत आहे, शेतीमध्ये आपल्याला अशा गोष्टींचा वापर करावा लागणार आहे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) येथील कार्यक्रमात बोलताना म्हटले. देशात बोगद्येबनवणं हे भविष्याच्या दृष्टीकोनातून खूप फायद्याचं ठरेल, येणाऱ्या काळात देशात 3 लाख करोड रुपयांचे बोगदे आपण बनवणार आहेत. देशात अधिकाधिक बोगदे बनविण्याची गरज असून आपल्याला सुरक्षा देखील पाहावी लागणार आहे. म्हणून आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून आपल्या देशात बोगद्याची मशिन आपल्याला बनवावी लागेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

